मुंबई -विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीतील घटक पक्षांची आज गुरुवारी बैठक पार पडली. यावेळी राज्यात स्थापन होणाऱ्या सत्तेत घटक पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. घटक पक्षांचे महत्त्व मोठे असल्याने आम्हाला ४ मंत्रिपदांसोबत महामंडळाचे अध्यक्षपद आणि जिल्हास्तरीय अध्यक्षपद देण्यात यावे, असे रामदास आठवले म्हणाले.
आजच्या बैठकीमध्ये आरपीआयचे रामदास आठवले, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे विनायक मेटे व राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उपस्थित होते.
भाजपला या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळाली आहेत. शिवसेनेपेक्षा त्यांचे आमदार दुप्पट असल्या कारणाने मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणीस असावेत, असे आम्हाला वाटत असल्याचे आठवले म्हणाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्यामध्ये आलेल्या सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी भाजप-सेनेने अधिक आढेवेढे न घेता सत्ता स्थापन करावी. यासाठी मी स्वतः मध्यस्थी करणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले.
भाजप-शिवसेना युतीसोबत असणारे पक्ष आणि त्यांचे निवडून आलेले आमदार -