महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

युतीचे मित्रपक्ष सत्तास्थापनेसाठी आतुर; राज्यपालांची घेतली भेट - SADABHAU KHOT

सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून भाजप हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे राज्यपाल महोदयांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी पाचारण करण्याची भाजपच्या मित्र पक्षांनी राज्यपालांकडे विनंती केली आहे.

सत्तास्थापनेसाठी युतीच्या मित्रपक्षांची राज्यपालांकडे विनंती

By

Published : Nov 2, 2019, 12:51 PM IST

Updated : Nov 2, 2019, 1:05 PM IST

मुंबई -सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष म्हणून भाजप हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे राज्यपाल महोदयांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी पाचारण करावे, अशी विनंती शनिवारी भाजपच्या मित्र पक्षांकडून राज्यपालांकडे केली. यासोबतच दुष्काळ परिस्थितीवरही त्यांच्यात चर्चा झाली.

सत्तास्थापनेसाठी युतीच्या मित्रपक्षांची राज्यपालांकडे विनंती

हेही वाचा -'तिढा सुटे पर्यंत अनिल कपूरला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा'

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत, रिपाइं नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महातेकर आदी नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी भाजपच्या समर्थनार्थ आपली भूमिका मांडली. भेटीपूर्वी रासपाचे नेते महादेव जानकर यांनी सांगितले की, राज्यात सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष भाजप असून याच पक्षाने सत्ता स्थापन केले पाहिजे. यासाठी राज्यपाल महोदयांना आम्ही विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने सोडवले असून आताच्या दुष्काळाच्या परिस्थितीत सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत चांगले काम करत असल्याचा दावा जानकर यांनी केला.

राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यामुळे त्यांची माहिती घेण्यासाठी ठिकठिकाणी आपण दौरे करत आहोत. आज आपण कोकणच्या दौऱ्यावर सायंकाळी निघणार असल्याची माहितीही जानकर यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना दिली. दरम्यान सदाभाऊ खोत यांनीही राज्यातील शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारची कमतरता पडणार नाही, याची काळजी सरकार घेणार असल्याची माहिती दिली.

हेही वाचा - सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - सदाभाऊ खोत

Last Updated : Nov 2, 2019, 1:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details