मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेविरोधात जाऊन कधी राम मंदिर तर कधी सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मते नोंदवणाऱ्या पार्थ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाली. पार्थ यांच्या भूमिकेमुळे मागील काही दिवसात माध्यमांतून अनेक प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्याबाबत सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
पार्थ पवार आणि सुप्रिया ताई सुळे यांच्यात आज सिल्वर ओक येथे तब्बल दोन तासांहून अधिक वेळ ही चर्चा झाली. याचर्चेत पार्थ पवार यांना समजावण्यात आले असल्याचे समजते. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व पार्थ यांचे आजोबा शरद पवार यांनी कोरोनाकाळात राम मंदिराचे भूमिपूजन केले जात असल्या वरुन टीका केली होती. पार्थ पवार यांनी पत्रक काढून शरद पवार यांच्या विरोधी मत नोंदवले होते. त्यात पार्थ यांनी राममंदिर भूमिपूजन ऐतिहासिक दिन असल्याची भावना व्यक्त केली होती. जय श्री रामने पत्राची सुरुवात आणि शेवटी केला होता.