महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबईत पार्किंगचा पेच; रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची पार्किंग - वाहतूककोंडी मुंबई बातमी

शहरात अपघातांची शक्यताही वाढली आहे. तसेच नेरुळ, वाशी, बेलापूर, ऐरोली, घणसोली, दिघा, कोपरखैरणे, तुर्भे, जुईनगर सानपाडा या परिसरात मोठ्या प्रमाणावर खासगी सोसायट्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्याच्या कडेला दुतर्फा लावली जात आहे.

रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची पार्किंग

By

Published : Nov 7, 2019, 5:17 PM IST

मुंबई - नवी मुंबईत दुतर्फा जाणाऱ्या पार्किंगमुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ होत आहे. अनधिकृत व बेशिस्त जाणाऱ्या पार्किंगमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. संपूर्ण नवी मुंबई शहरात ही परिस्थिती पाहायला मिळतं आहे. पामबीच रोड परिसरात मागील काही वर्षांत वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची दुतर्फा बेकायदा पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होत आहेत.

रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची पार्किंग

हेही वाचा-वन्य हत्ती विरुद्ध माणूस संघर्ष : आसाममधील 'या' तरुणाने शोधला अनोखा उपाय... आता हत्तीही खूश आणि शेतकरीही!

शहरात अपघातांची शक्यताही वाढली आहे. तसेच नेरुळ, वाशी, बेलापूर, ऐरोली, घणसोली, दिघा, कोपरखैरणे, तुर्भे, जुईनगर सानपाडा या परिसरात मोठ्या प्रमाणावर खासगी सोसायट्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्याच्या कडेला दुतर्फा लावली जात आहे. विशेषतः एलआयजी मध्ये राहणाऱ्या नागरिकांची वाहने रस्त्यावर पार्क केली जात आहेत. त्यामुळे बाह्य व अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात संध्याकाळी वाहतूक कोंडी होत आहे. मोठं वाहन असेल तर छोट्या रस्त्यावर वाहने अडकून पडणे या सारख्या समस्या होत आहेत. वाशी ते बेलापूर, पामबीच रोड वाहनचालकांसाठी वरदान आहे. मार्ग तयार करताना त्यावर कोणत्याही प्रकारची पार्किंग न करण्याची खबरदारी घेण्यात आली होती. कोणत्याही अडथळ्या विना कमी वेळेत हवे त्या ठिकाणी पोहोचता यावे, अशी या मागची कल्पना होती. मात्र, मागील काही वर्षांत या हेतूला हरताळ फासला आहे. तेथेंही रस्त्याच्या कडेला तेही दुतर्फा पार्किंग केली जात आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details