मुंबई- शहरात बुधवारपासून पाऊस पडत आहे. त्यानंतर पडझडीच्या आणि जमीन धसण्याचे प्रकार घडू लागले आहेत. घाटकोपर पश्चिम कामालेन येथील रामनिवास सोसायटीमध्येही अशीच एक घटना घडली आहे. या सोसाटीमध्ये विहिरीवर आरसीसी स्लॅब टाकून वाहने पार्क केली जात होती. आज सदर स्लॅब कोसळून पार्क करण्यात आलेली कार पाण्यात बुडाली. यावेळी कारमध्ये कोणीही नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घाटकोपरमध्ये स्लॅब कोसळून कार बुडाली पाण्यात; पाहा व्हिडिओ - स्लॅब कोसळून कार बुडाली पाण्यात
मुंबईत बुधवारपासून पाऊस पडत आहे. यामुळे बुधवारी मालाड मालवणी येथे घर कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी दहिसर येथे तीन ते चार घरे कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.
कार बुडाली
घाटकोपर पश्चिम कामा लेन येथील त्रिभुवन मिठाईवालाच्या पाठीमागे रामनिवास नावाची सोसायटी आहे. या जुन्या सोसायटीतील विहीरीच्या अर्ध्या भागात कित्येक वर्षापूर्वी सोसायटीने आर सी सी करून अर्धे विहीर झाकली होती. त्यावर सोसायटीतील रहिवाशी वाहने पार्क करीत असत. सदर विहिरीवरील आरसीसी स्लॅब आज पावसामुळे खचला. त्यावर पंकज मेहता यांनी पार्क केलेली कार विहिरीत पडून बुडाली. या घटनेची माहिती वाहतूक नियंत्रण कक्षास माहिती दिली असता विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहाणी केली.
पडझडीच्या घटना, 13 मृत्यू
मुंबईत बुधवारपासून पाऊस पडत आहे. यामुळे बुधवारी मालाड मालवणी येथे घर कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी दहिसर येथे तीन ते चार घरे कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसात मुंबईत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पवई येथील पालिकेच्या प्रशिक्षण केंद्राची सुरक्षा भिंत आणि आवारातील जमीन धसल्याने ५ वाहनांचे नुकसान झाले आहे.