मुंबई :स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या 'वाळवी' (Vaalvi Movie) च्या ट्रेलर आणि पोस्टर चे नुकतेच अनावरण (Vaalvi trailer and poster released) करण्यात आले. ट्रेलर मधील रहस्यमय वातावरणात 'दिसतं तसं नसतं' ही म्हण आवर्जून उठून दिसते. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम चित्रपट आहे आणि त्याचे दिग्दर्शन केले आहे परेश मोकाशी (Paresh Mokashi directed) यांनी. व त्याची प्रस्तुती केली आहे 'झी स्टुडिओज' ने. यापूर्वी झी स्टुडिओज आणि परेश मोकाशी यांनी मराठी सिनेसृष्टीला हरीशचंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि चि. व चि. सौ. का. असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. Vaalvi Movie Trailer
'वाळवी' हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ती, लाकूड पोखरणारी किड. एवढं नुकसान करणारी हीच वाळवी जर एखाद्या नात्याला लागली तर काय घडू शकते? हे परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे एका वेगळ्याच अंदाजात दिसत असून; त्यांच्या व्यक्तिरेखा चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढवणाऱ्या आहेत असे निर्मात्यांचे म्हणणे आहे.