मुंबई :चांगल्या भविष्यासाठी पालक आपल्या मुलांना चांगल्या शाळेत पाठवतात. मुलांना चांगले शिक्षण मिळते, पण कठीण परिस्थितीशी लढण्याचे कौशल्य त्यांना पुस्तकी ज्ञानाशिवाय प्रेक्टिकलमधूनच ( Practical Knowledge Important ) मिळते. पालकच मुलांना घरी जबाबदारीचे धडे शिकवतात. पालक त्यांना लहानपणापासूनच प्रत्येक संकटासाठी तयार करू शकतात. यासाठी पालकांनी लहानपणापासूनच अशा सवयी मुलांमध्ये रुजवाव्यात, जेणेकरून ते बाहेरच्या जगात वावरताना, कोणत्याही अडचणीत असतील तर त्यांना धीराने तोंड देतात. लहानपणापासूनच मुलांना जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे. मुलांना जबाबदार बनवण्यासाठी पालकांनी या चार गोष्टी केल्या ( Parenting Tips ) पाहिजेत.
शिस्त :लहान मुले असो वा प्रौढ, जीवनात शिस्त आवश्यक आहे. त्यांना लहानपणापासूनच शिस्त लावायला शिकवा जेणेकरून ते मोठे झाल्यावर चांगले आणि निरोगी जीवन जगतील. मुलांना रोज सकाळी वेळेवर उठायला शिकवा, त्यानंतर संपूर्ण दिवसाच्या कामाचे वेळापत्रक तयार करा आणि ती सर्व कामे वेळेवर पूर्ण करा. यावरून मुलांना वेळ आणि प्रत्येक गोष्टीची किंमत ( children aware of responsibilities ) कळते.