मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर अनेक विभागात नोकरभरती झाली. नोकरभरतीच्या सर्व प्रक्रिया झाल्या. मात्र, नियुक्त्या झाल्या नाहीत. याबाबत मराठा तरुण आझाद मैदानात आंदोलनासाठी बसले आहेत. या विद्यार्थ्यांना नोकरीत सामावून घ्यावं यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली.
मराठा विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न लवकरच सुटेल - प्रविण दरेकर - मराठा विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न लवकरच सुटेल
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. मराठा विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचा प्रश्नांसंबधी वडेट्टीवार आणि दरेकर यांच्यात बैठक झाली. मराठा विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न लवकरच सुटेल, असा आशावाद दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाच्या मागण्यांविषयी प्रवीण दरेकर यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. यावेळी सामान्य प्रशासन आणि विधी व न्याय विभागाच्या अधिकारीही उपस्थित होते. ही बैठक सकारात्मक झाल्याचे दरेकर म्हणाले. तसेच मराठा विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न लवकरच सुटेल असेही ते म्हणाले.
जेव्हा मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाले. त्यादिवशी मी या आंदोलकांची भेट घेतली. यानंतर संबधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहले होते. त्या विषयावर आज बैठकही लावण्यात आली होती. दोन ते तीन दिवसात हा 3 हजार 500 मराठा तरुणांच्या नियुक्तीचा प्रश्न उपसमितीसमोर मांडू असे आश्वासन सबंधित मंत्र्यांनी दिलं असल्याचे दरेकर यांनी सांगितले. उपसमितीच्या बैठकीत 3 हजार 500 मराठा विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटेल अशी आशा आहे. अन्यथा पुढची दिशा मराठा बांधवाना ठरवून घेऊ असेही ते यावेळी म्हणाले.