मुंबई-मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेले पत्र हे राजकीय दबावापोटी असल्याची शंका आम्हाला येते असे वक्तव्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. या संपूर्ण घटनेवर काँग्रेसचा लक्ष आहे. मात्र, हे पत्र परमबीर सिंग यांनी बदली झाल्यानंतरच काय लिहिले याबद्दल शंका निर्माण होते. या प्रकरणात जे काही सत्य आहे ते समोर यायला पाहिजे असा काँग्रेसचा आग्रह आहे, पण पत्र लिहिणार्या परमबीर सिंग यांच्या हेतूबद्दलच काँग्रेसच्या मनात शंका असल्याचे स्पष्ट मत बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा-अनिल देशमुखांविरोधात परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात, याचिकेतून भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी
वेळ आल्यावर काँग्रेस आपल्या भूमिका स्पष्ट करेल
या पत्रात दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा देखील उल्लेख आहे. पण एकादी घटना जिथे घडते, तिथे त्या घटनेबद्दल गुन्हा नोंद होत असतो, यात चूक काय आहे? असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला आहे. तसेच या प्रकरणात काल दिल्लीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील हे देखील होते. या प्रकरणावर सविस्तर चर्चा शिवसेना आणि राष्ट्वदी काँग्रेसच्या नेत्यांसोबत झाली असल्याची माहिती थोरात यांनी दिली. तसेच वेळ आल्यावर काँग्रेस आपल्या भूमिका स्पष्ट करेल, असेही थोरात म्हणाले. एका अधिकाऱ्याने आरोप केले म्हणून मंत्र्यांना राजीनामा द्यावा, ही मागणी योग्य नसल्याचे मत थोरात यांनी व्यक्त केले. जर अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागत असेल तर कोणताच सरकार चालणार नाही असेही ते म्हणाले.
हेही वाचा-देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढविली