मुंबई- पोलीस आयुक्त पदावरून संजय बर्वे हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी लाचलुचपत विभागाचे प्रमुख परमबीर सिंग यांची वर्णी लागली आहे आहे. शनिवारी दुपारी 3 वाजता परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला.
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी स्वीकारला पदभार - Paramvir Singh
माझी प्राथमिकता ही मुंबईतील गुन्हे कमी करण्यावर आहे. याबरोबरच गेल्या काही वर्षांमध्ये खंडणी व अंडरवर्ल्डच्या संदर्भात मुंबई पोलिसांकडून चांगले काम झाले आहे. हे चांगले काम यापुढेही असेच सुरू ठेवण्याचा निर्धार परमबीर सिंग यांनी केला आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना परमबीर सिंग यांनी सांगितले की, माझी प्राथमिकता ही मुंबईतील गुन्हे कमी करण्यावर आहे. याबरोबरच गेल्या काही वर्षांमध्ये खंडणी व अंडरवर्ल्डच्या संदर्भात मुंबई पोलिसांकडून चांगले काम झाले आहे. हे चांगले काम यापुढेही असेच सुरू ठेवण्याचा निर्धार सिंग यांनी केला आहे.
मुंबई शहरात महिलांच्या बाबतीत होणाऱ्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवून अधिकाधिक महिला सुरक्षित कशा राहतील या गोष्टीकडेही आपली प्राथमिकता असेल, असे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले.