मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी ( Businessman Mukesh Ambani ) यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण ( Antilia explosives case ) आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील ( Mansukh Hiren murder case ) आरोपी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. दरम्यान मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेले स्फोटक संदर्भातील फेक मेसेज पसरवण्याकरिता माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग ( Former Police Commissioner Paramveer Singh ) यांनी पाच लाख रुपये दिले होते, सुनावणी दरम्यान या प्रकरणातील सह आरोपी रियाझ काझी यांचे वकील युग चौधरी यांनी न्यायालयासमोर अशी माहिती दिली आहे.
पाच लाख रूपये दिले - अँटिलिया निवास जवळ सापडलेले स्फोटक प्रकरणाचा ( Antilia explosives case ) मुंबई पोलिसांकडून तपास सुरू असताना तिहार जेल मधून या प्रकरणाची पूर्ण जबाबदारी घेण्यात येणारा मेसेज आला होता. हा मेसेज पसरवण्याकरिता माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी संबंधित व्यक्तीला पाच लाख रुपये दिले होते, अशी धक्कादायक माहिती या प्रकरणातील सह आरोपी असलेले रियाझ काझी यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान आज दिली आहे.
न्यायलयाचे लक्ष वेधले -एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या वतीने वरिष्ठ एडवोकेट आबाद पोडा यांनी केलेल्या तपासासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केलेल्या आरोप पत्रामध्ये अनेक गोष्टींची माहिती देण्यात आलेली नाही आहे. मात्र फक्त युक्तीवादा दरम्यान यासंदर्भात सरकारी वकील बोलत आहे, तसेच या प्रकरणात जप्त केलेल्या साहित्यांचा देखील अद्यापही फॉरेन्सिक रिपोर्ट आलेला नाही आहे. या संदर्भात विचारले असता सरकारी वकील यांनी ही बाब मान्य केली आहे. अतिशय महत्त्वाचे असलेल्या प्रकरणात देखील एक वर्षाच्या कालावधी होत असताना देखील फॉरेन्सिक रिपोर्ट अद्यापही आली नसल्याने आबाद पोंडा होता यांनी या संदर्भात न्यायालयाचे लक्ष वेधले होते.
प्रकरणावर न्यायलयात सुनावणी -आरोपपत्र 9 ते 10 हजार पानांचे असून यात मुंबई पोलीस दलातील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, निलंबित एपीआय रियाझुद्दीन काझी, निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने, निलंबित पोलीस हवालदार विनायक शिंदे, नरेश गोर, संतोष शेलार, आनंद जाधव, मनीष सोनी व सतीश तिरूपती मुतकारी यांच्या नावांचा समावेश आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या वकिलांनी आरोप पत्रांमधील अनेक मुद्द्यांवर घेतलेल्या हरकती नंतर न्यायाधीश मोहिते डेरे आणि न्यायाधीश आर एन लड्डा यांच्या खंडपीठाने यांना उद्या होणाऱ्या सुनावणी दरम्यान सीसीटीव्ही फुटेज खंडपीठांसमोर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. आज सुनावणी दरम्यान एनआयआयच्या (NIA) वतीने अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला.