मुंबई- मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून संजय बर्वे निवृत्त झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांची वर्णी लागली आहे. जून 2022 पर्यंत यांचा आयुक्त पदावर कार्यकाळ राहणार आहे.
परमबीर सिंग हे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून सिंग यांची ओळख आहे. गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या सरकारमधील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. लाललुचत प्रतिबंधक विभागापूर्वी त्यांनी ठाण्याचे आयुक्त म्हणून काम पाहिले होते. त्यांच्याच कार्यकाळात अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर त्यांना राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यस्थेचा यापदी नेमण्यात आले.