मुंबई:दर्शन सोळंकी हा गुजरात येथील राहणारा आहे. आयआयटी मुंबई येथे केमिकल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाला त्याने प्रवेश घेतला. अत्यंत हुशार आणि अभ्यासात नियमितपणे लक्षात येणारा विद्यार्थी अशी त्याची खाती होती. याआधी देखील त्याला तणावाला सामोरे जावे लागले. जातीभेदाची वागणूक त्याला दिली गेली. म्हणून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र ही त्याची दुसरी वेळ असून या वेळेला त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात अनेक तर्कवितर्क आणि आरोप देखील विद्यार्थ्यांकडून होऊ लागले आहेत. त्यामुळे आयआयटी प्रशासन प्रमुख संचालक सुभाशीष चौधरी यांनी स्वतंत्र तपास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
समांतर तपास सुरू:दर्शन सोळंकी याचे काका देवांग कुमार आणि त्याची बहीण म्हणाले, जातिभेदामुळे दर्शनला अमानवी वागणूक दिली गेली. त्यामुळे तो तणावाखाली होता आणि त्याच्या मृत्यूस कारण जातीभेदाचा व्यवहारच होता असे त्यांनी आपल्या आरोपात म्हटले आहे. त्याच्या मृत्यूनंतर अंत्यविधी उरकून त्यानंतर मुंबईतील पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यासाठी त्याचे नातेवाईक येणारच आहेत. आयआयटी मुंबई वतीने प्रशासन पातळीवर प्राध्यापक नंदकिशोर यांच्या नेतृत्वाखाली समांतर तपास सुरू केला आहे.
आता संचालक झाले भावूक: आयआयटी मुंबईचे संचालक सुभाषित चौधरी यांनी यासंदर्भात म्हटले की, प्रिय विद्यार्थी आणि सहकारी, माझ्या शेवटच्या ईमेलमध्ये (रविवार १२ फेब्रुवारी रोजी) आमच्या बीटेकच्या दुर्दैवी आणि अकाली मृत्यूबद्दल उल्लेख केला होता. प्रथम वर्षाचे विद्यार्थी दर्शन सोळंकी. मी तुमच्यासोबत काही अपडेट्स शेअर करू इच्छितो. मुंबई पोलीस आणि IIT बॉम्बे हे दोघेही दर्शनच्या मृत्यूमागील वातावरण/घटना/कारणांचा सक्रियपणे तपास करत आहेत. पोलिसांनी मोठ्या संख्येने लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि फॉरेन्सिक विश्लेषणासाठी दर्शनचा फोन आणि लॅपटॉप ताब्यात घेतला. आम्ही पोलिसांकडून कारणास्तव अपडेट्सची वाट पाहत आहोत.
संचालक काय म्हणताहेत?आम्ही प्रा. नंदकिशोर यांच्या नेतृत्वाखाली आमचा स्वतःचा तपास सुरू केला आहे, जे अलीकडेपर्यंत आमचे मुख्य दक्षता अधिकारी होते आणि त्यांना या प्रकरणांचा अनुभव आहे. आयआयटी तपासणी समितीमध्ये SC/ST विद्यार्थी सेल सदस्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये दोन्ही प्राध्यापक आणि विद्यार्थी, काही विद्यार्थी मार्गदर्शक समन्वयक आणि आमच्या रुग्णालयाचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे. ज्यांच्याकडे संबंधित माहिती असेल अशा प्रत्येकाला ही समिती सक्रियपणे भेटत आहे. विद्यार्थी इतरांनी देखील यात सहकार्य करावे, असे संचालक सुभाषिश चौधरी म्हणाले. दर्शन सोळंकी याची कुठल्याही पद्धतीने आत्महत्या झाली. असो मात्र त्याचा तपास व्यवस्थितपणे व्हावा. तसेच त्याला जाती भेदभावाची वागणूक मिळाली होती हे त्याच्या काही मित्रांनी सांगितल्याचे देखील मृत दर्शन सोळंकी याचे काका देवांग कुमार यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना म्हटले आहे.
हेही वाचा:Pradhan Mantri Awas Yojana : पंतप्रधान कार्यालयाने घेतली आवास योजनेतील घोटाळ्याची दखल; ई़डीमार्फत होणार चौकशी