मुंबई - विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी घाटकोपर पूर्वला प्रकाश मेहता यांच्या घराजवळ मोठा गोंधळ झाला. भारतीय जनता पक्षाने पराग शहा यांना उमेदवारी दिल्याने मेहता यांचे समर्थक संतप्त झालेले पहायला मिळाले होते. त्यांनी पराग शहा यांच्या गाडीची तोडफोडही केली. त्यानंतर पराग शहा यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज पतनगरच्या निवडणूक कार्यालयात दाखल केला आहे.
घाटकोपर पूर्वमधील राड्यानंतर अखेर पराग शहांचा उमेदवारी अर्ज दाखल - Ghatkopar East assembly constituency BJP candidate
भारतीय जनता पक्षाने पराग शहा यांना उमेदवारी दिल्याने मेहता यांचे समर्थक संतप्त झालेले पाहायला मिळाले होते. पराग शहा यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज पतनगरच्या निवडणूक कार्यालयात दाखल केला आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गजांना तिकीट नाकारले आहे. यामध्ये घाटकोपर पूर्वचे प्रकाश मेहता यांचासुद्धा समावेश आहे.
हेही वाचा -दिग्गजांच्या तिकिट कपातीने मुख्यमंत्र्यांचे आसन बळकट
या विधानसभा निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गजांना तिकीट नाकारले आहे. यामध्ये घाटकोपर पूर्वचे प्रकाश मेहता यांना सुद्धा यावेळी उमेदवारी देण्यात आली नाही. त्यांच्या जागेवर त्यांचेच शिष्य असलेले पराग शहा यांना आज उमेदवरी जाहीर केली. त्यानंतर ते फॉर्म भरण्यासाठी निघाले असता त्यांच्या इमारतीखाली प्रकाश मेहता यांच्या समर्थकांनी एक तास पराग शहा यांच्या विरोधात नारेबाजी केली. ते गाडीतून जात असताना त्यांच्या गाडीच्या काचा सुद्धा फोडल्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना त्यांच्यासोबत ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक, राम कदम आणि इतर नेते उपस्थित होते.