मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी धनंजय मुंडे यांच्या कारला परळीमध्ये मंगळवारी 3 जानेवारी 2023 रोजी रात्री अपघात झाला आहे. यामध्ये मुंडे यांच्या छातीला आणि डोक्याला मार लागला. या अपघातात मुंडेंच्या कारचंही मोठे नुकसान झाले. सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आज पंकजा मुंडे यांनी त्यांची भेट घेतली. बहिणीने भावाची भेट घेतल्यामुळे आणि राजकीय मतभेद त्यांचे जग जाहीर असताना भेटीचे फोटो प्रसारित होत आहेत. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेते एडवोकेट अमोल मातेले यांनी मत व्यक्त केले. ही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. शरद पवार साहेबानी दिलेले संस्कार आहेत, असे राष्ट्रवादीचे नेते अमोल मातेले यांनी म्हटले आहे.
रुग्णालयात बंधू धनंजय मुंडे यांची भेट :पंकजा मुंडे आणि धनजंय मुंडे यांच्यात असलेले राजकीय वैर सर्वश्रूत आहे. अनेकदा ते सार्वजनिक मंचावरुन एकमेकांवर टीका करतात. पण, गरजेवेळी ते नेहमी एकमेकांच्या पाठीशीही उभे असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. आताही राजकीय वैर विसरुन पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात बंधू धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. या भेटीचे काही फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. यामध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी करताना दिसत आहेत.
धनंजय मुंडे यांच्या वाहनास अपघात :दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी रात्री 12च्या सुमारास परळीमध्ये अपघात झाला होता. दुसऱ्या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली होती. 'मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अशी माहिती ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली होती.