महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pankaja Munde : धक्कादायक! पंकजा मुंडेंनाही मराठी असल्यानं मुंबईत घर नाकारलं, इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या... - मराठी असल्यानं मुंबईत घर नाकारलं

Pankaja Munde : भाजपा नेत्या आणि माजी आमदार पंकजा मुंडे यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत धक्कादायक खुलासा केलाय. मराठी असल्यानं मुंबईत घर नाकारल्याचा प्रकार माझ्यासोबतही घडल्याचं त्या म्हणाल्या.

Pankaja Munde
Pankaja Munde

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 11:27 AM IST

Updated : Sep 29, 2023, 12:04 PM IST

मुंबई Pankaja Munde : दोन दिवसांपूर्वी मुंबईतील मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. आता आणखी एक तसंच प्रकरण उघडकीस आलं आहे. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांना मराठी असल्यानं मुंबईत घर नाकारण्यात आल्याचा दावा केलाय. त्यांनी गणपती विसर्जनाच्या दिवशी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत हा खुलासा केला.

पंकजा मुंडेंनी आपला अनुभव सांगितला : मुंबईत मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनीही आपल्याला असा अनुभव आल्याचं सांगितलं. 'मी एका मराठी महिलेची व्यथा पाहिली. मला भाषा आणि प्रांतवादामध्ये पडायला आवडत नाही. मी माझ्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत कधीही प्रांतवाद, धर्मवाद किंवा जातीवादावर टिप्पणी केलेली नाही. मात्र जेव्हा एक मराठी महिला रडून सांगते की तिला मराठी असल्यानं ऑफिससाठी जागा दिली नाही, हा प्रकार मला अस्वस्थ करणारा आहे. जेव्हा मला माझं सरकारी घर सोडून स्वत:च घर घ्यायचं होतं तेव्हा मलाही बऱ्याच ठिकाणी हा अनुभव आला', असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मराठी असल्यानं घर नाकारण दुर्देवी : या संदर्भात पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'मी कोणत्याही एका भाषेची बाजू घेत नाही. मुंबई फक्त राज्याची राजधानी नसून देशाची आर्थिक राजधानीही आहे. त्यामुळे इथं सर्वांचंच स्वागत केलं जातं. मात्र येथील काही इमारतींमध्ये मराठी असल्यानं घर नाकारणं दुर्देवी आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला देखील याचा अनुभव आला', असं त्या म्हणाल्या.

राज ठाकरेंची 'X' वर पोस्ट :मुंबईमध्ये मराठी महिलेला ऑफिससाठी जागा नाकारल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'X' वर पोस्ट करत आपली भूमिका मांडली. 'माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीनं दम दिल्यानंतर त्या बिल्डिंगच्या सचिवानं माफीनामा दिला. हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. सरकारनं पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे', असं ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. Refused House to Marathi Woman : मराठी असल्यानं महिलेला मुंबईत घर नाकारलं; 'मनसे'नं दाखवला इंगा
  2. Jai Shree Ram : ‘जय श्री राम’ बोलण्यास नकार दिल्यानं तरुणावर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल
Last Updated : Sep 29, 2023, 12:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details