मुंबई - भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून माहिती दिली. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
पंकजा मुंडे यांच ट्विट....
माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा स्वतःला विलगीकरणामध्ये ठेवले होतं. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. त्यानंतर आज त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती ट्विटद्वारे दिली. मी सुखरूप सुरक्षित असून घरीच उपचार घेत आहे असेही ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.