महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेरजेच्या राजकारणासाठी बदलले विद्यमान खासदार - पंकजा मुंडे

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी पंकजा मुंडे यांना विचारण्यात आलेल्या प्रशांना त्यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी ग्रामविकास आणि महिला बाल कल्याण विभागांच्या विविध योजनांची माहिती दिली. विद्यमान खासदार का बदलले याचे मला उत्तर देता येणार नाही. स्थानिक राजकारण याला धरूनही पक्षाला निर्णय घ्यावे लागतात, असेही त्यांनी सांगितले.

By

Published : Mar 24, 2019, 2:26 PM IST

बेरजेच्या राजकारणासाठी बदलले विद्यमान खासदार - पंकजा मुंडे

मुंबई - लोकसभेत अधिक मताधिक्य आणि अधिक जागा जिंकण्यासाठी बेरजेचे राजकारण करायचे असते, त्यामुळेच पक्षाने काही ठिकाणी बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिल्याचे भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीत काही विद्यमान खासदारांना वगळून इतर पक्षातून आलेल्यांना संधी देण्यात आली आहे.

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी पंकजा मुंडे यांना विचारण्यात आलेल्या प्रशांना त्यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी ग्रामविकास आणि महिला बाल कल्याण विभागांच्या विविध योजनांची माहिती दिली. विद्यमान खासदार का बदलले याचे मला उत्तर देता येणार नाही. स्थानिक राजकारण याला धरूनही पक्षाला निर्णय घ्यावे लागतात, असेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम या लोकसभेत दिसून येतील. जनतेने २०१४ साली पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास दाखवला. त्याचप्रमाणे २०१९ मध्ये ही भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकतील, असा विश्वास यावेळी पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details