महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pankaj Bhujbal : पंकज भुजबळ यांचा विदेशात जाण्याचा मार्ग मोकळा - छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंकज भुजबळ यांचा विदेशात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईतील सत्र न्यायालयाने 10 ते 20 जून 2023 पर्यंत त्यांना विदेशात जाण्याची मुभा दिली आहे. ही सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

Sessions Court
Sessions Court

By

Published : May 29, 2023, 7:37 PM IST

मुंबई -महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ तसेच त्यांचे चिरंजीव पंकज यांना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला आहे. अँटी करप्शन ब्युरो यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांची दोष मुक्तता झालेली आहे. परंतु तो खटला निकाली निघाल्यानंतर लागलीच सक्त वसुली संचलनालय यांच्या वतीने पुन्हा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल केला. मात्र यामध्ये पंकज भुजबळ यांनी विदेशात जाण्यासाठीचा अनुमती अर्ज सुट्टीकालीन न्यायालय क्रमांक 54 यांच्याकडे केला होता न्यायालयाने त्यांचा अर्ज गुणवत्तेच्या आधारे मंजूर केला.

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणांमध्ये आरोपी असलेले छगन भुजबळ आणि त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांच्या संदर्भातली सुनावणी नियमित रीतीने सत्र न्यायालयामध्ये सुरू आहेत. विशेषतः पीएमएलए न्यायालयामध्ये या संदर्भातली ही सुनावणी सातत्याने सुरू होती. परंतु पंकज भुजबळ यांनी विदेशामध्ये त्यांना त्यांच्या कामानिमित्ताने जाण्यासाठीचा विनंती अर्ज न्यायालयात केला होता. न्यायालयाने गुणवत्तेच्या आधारे त्यांच्या अर्जाची पडताळणी केली आणि अखेर 10 जून ते 20 जून 2023 पर्यंत त्यांना मर्यादित स्वरूपात विदेशात जाण्याची अखेर अनुमती मिळाली.

खटल्याची पार्श्वभूमी - कथितरीत्या महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे. त्यामध्ये पंकज भुजबळ तसेच त्यांच्यासह इतर आरोपी देखील आहेत. वास्तविक या प्रकरणांमध्ये न्यायालयानेच छगन भुजबळ पंकज भुजबळ यांना निर्दोष म्हणून त्यांची एसीबीच्या यासंदर्भातील खटल्यातून मुक्तता केली होती. परंतु त्यानंतर सक्त वसुली संचालनालयाने पुन्हा त्या अनुषंगाने नवीन गुन्हा दाखल केला. त्यामुळे हा खटला मुंबईच्या पीएमएलए न्यायालयात सुरू आहे.


या खटल्याच्या संदर्भात छगन भुजबळ जेव्हा गैरहजर राहिले होते. तेव्हा त्यांच्या नावे न्यायमूर्ती रोकडे यांनी वॉरंट जारी केले होते. म्हणून नियमित छगन भुजबळ हजेरी लावत असतात. परंतु राजकीय नेते असल्यामुळे अनेकदा ते व्यस्त असतात. काहीवेळा गैरहजर असण्याची सूट बाबत त्यांनी न्यायालयाकडे अर्ज देखील केला होता .पुढील 12 जून रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये सर्व आरोपींसह हजर राहण्याचे निर्देशही पीएमएलए न्यायालयाने दिले आहेत.


एका न्यायालयाने त्या गुन्ह्यामध्ये दोष मुक्त केले. परंतु ईडीच्यावतीने पुन्हा त्यांच्यावर त्याच प्रकरणात गुन्हा दाखल केल्यामुळे दोष मुक्ती करण्यासाठीचा छगन भुजबळ यांचा हा अर्ज आहे. या संदर्भात बारा जून रोजी आता दोष मुक्तीच्या अर्जावर पुन्हा सुनावणी होईल. मात्र 12 जून रोजी सर्वच्या सर्व 52 आरोपी यांनी हजर राहावे;असे देखील न्यायालयाने म्हटले आहे. मात्र तातडीचा म्हणून विदेशात जाण्यासाठीचा अनुमती अर्ज यावर न्यायालयाने सुनावणी घेतली आणि विदेशात जाण्याचा अखेर पंकज भुजबळ यांचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा...

  1. Maharashtra Sadan Scam : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांची सेशन कोर्टात हजेरी
  2. No Relief To Bhujbal : छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी टांगती तलवार कायम, कोर्टाने दिली पुढची तारीख

ABOUT THE AUTHOR

...view details