रायपुर :पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपुरात कथेदरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानासंदर्भात वक्तव्य केले आहे. नागपुरात आमची कथा सात दिवसांचीच होती. ती पूर्ण करुनच आम्ही परतलो. आम्ही कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. आम्हाला बदनाम करण्याचा काही लोकांचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांची मानसिकता छोटी असून त्यांचे अव्हान मी स्वीकारतो असे ते रायपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
श्याम मानवांचे अव्हान स्वीकारले : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना दरबारात आमंत्रित करण्यात आल्याची माहिती पंडित धीरेंद्र कुमार शास्त्रींनी दिली आहे. तर नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर सात दिवसच रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. कथा पूर्ण करून पुढच्या प्रवासाला निघालो. नंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वाद निर्माण केला. मी कथा सोडून पळालेलो नाही. मी तिथे होतो तेव्हा ते कार्यकर्ते का आले नाहीत, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
चमत्कार सिद्ध केल्यास ३० लाखांचे बक्षीस : धीरेंद्र शास्त्रींनी किमान दहा लोकांवर चमत्कार सिद्ध केल्यास ३० लाख देऊ असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून देण्यात आले होते. आता पंडित धीरेंद्र कुमार शास्त्रीं यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन स्वीकारले. रायपूर छत्तीसगड मध्ये 20 आणि 21 जानेवारीला बागेश्वर धामकडून दिव्य दरबार भरवला जाणार आहे.
सनातनी धर्म पूर्णपणे अहिंसक : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की धर्मांतर रोखण्यासाठी अंतर्गत तसेच ग्रामीण भागात नवीन विचारधारा आणण्यासाठी दर 2 महिन्यांनी 3 दिवसांची कथा आयोजित केली जात आहे. धर्मांतर थांबवता येईल. ख्रिश्चन धर्माला झालेले अनेक हिंदू परत धर्मांत आल्याचा दावा त्यांनी केला. भविष्यातही अखंड कथांचे आयोजन केले जाईल असे ते म्हणाले.