महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Corona Pandemic to Endemic : मुंबईत लवकरच कोरोना संपणार; पालिका प्रशासनाने व्यक्त केला विश्वास

मुंबईमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. ( Corona Third Wave in Mumbai ) या दरम्यान रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने अँटीबॉडीज तयार होऊन हर्ड इम्युनिटी तयार होणार आहे. मुंबई सध्या पँडेमिककडून एन्डेमिककडे चालली असल्याने लवकरच मुंबईत कोरोना विषाणूचा आजार हा इतर सामान्य आजारांसारखा होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त केला आहे. ( Mumbai Corona Pandemic to Endemic )

mumbai corona special news
मुंबई कोरोना विशेष बातमी

By

Published : Jan 11, 2022, 7:19 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. ( Corona Third Wave in Mumbai ) या दरम्यान रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने अँटीबॉडीज तयार होऊन हर्ड इम्युनिटी तयार होणार आहे. मुंबई सध्या पँडेमिककडून एन्डेमिककडे चालली असल्याने लवकरच मुंबईत कोरोना विषाणूचा आजार हा इतर सामान्य आजारांसारखा होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त केला आहे. ( Mumbai Corona Pandemic to Endemic ) सेल्फ टेस्ट किट विक्रेत्यांना त्याची नोंद ठेवावी लागणार आहे. तसेच जे लोक क्वारंटाईनचे नियम तोडतील त्यांना थेट क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

पँडेमिककडून एन्डेमिककडे -

मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान कोरोनाच्या तीन लाटा आल्या आहेत. दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. तर तिसरी लाट सुरू झाली आहे. तिसऱ्या लाटेदरम्यान तीन दिवस रोज २० हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर रुग्णसंख्या कमी झाली आहे. टास्क फोर्सने ( Task Force on Mumbai Corona ) जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या कमी होईल, असे सांगितले होते. मात्र, दुसऱ्याच आठवड्यात रुग्णसंख्या कमी झाली आहे. बहुतेक रुग्ण घरीच राहून बरे होते आहेत. या कारणाने मुंबईकरांमध्ये अँटीबॉडीज तयार होऊन हर्ड इम्युनिटी तयार होईल. आपण सध्या पँडेमिककडून एन्डेमिककडे चाललो आहेत. यामुळे येत्या काळात कोरोनाचा आजार सर्वसामान्य आजारांप्रमाणे होईल, असा विश्वास पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Mumbai MND Additional Comissioner Suresh Kakani ) यांनी व्यक्त केला.

चाचण्या सुरूच राहणार -

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या चाचण्या करण्याची गरज नसल्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. मात्र, मुंबईमध्ये ९० टक्के लोक लोकल ट्रेनने प्रवास करतात. छोट्या घरांमध्ये दाटीवाटेने जास्त संख्येने लोक एकत्र राहतात. यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. चाचण्या केल्यास रुग्ण समोर येऊन त्यांच्यावर उपचार वेळेवर करता येणार असल्याने मुंबईमध्ये चाचण्यांची संख्या कमी केली जाणार नाही, अशी माहिती काकाणी यांनी दिली.

हेही वाचा -मुंबईत गेल्या महिनाभरात ३,५१६ मुलांना कोरोना, एकाही मुलाचा कोविडने मृत्यू नाही

डॉक्टरांना ट्रेनिंग -

सध्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी बहुसंख्य रुग्ण घरच्या घरीच औषधी घेऊन बरे होत आहेत. अशावेळी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणे पॉझिटिव्ह रुग्ण असल्यास त्याला कोणत्या प्रकारची औषधें द्यावीत, कोणते उपचार करावेत, आरटीपीसीआर चाचणी करण्याचा सल्ला कधी द्यावा, याचे ट्रेनिंग नर्सिंग होम आणि खासगी दवाखान्यातील डॉक्टरांना देण्यात येणार आहे. यामुळे मुंबईमध्ये उपचाराचा एकच प्रोटोकॉल असेल, असे काकाणी यांनी सांगितले.

नियम मोडल्यास क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती करणार -

मुंबईत बहुसंख्य रुग्ण घरातच बरे होत असल्याने होम क्वारंटाईन आहेत. या रुग्णांकडून होम क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून आरोग्य विभाग आणि स्थानिक वॉर्ड कार्यलयाला लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे. होम क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आल्यास रुग्णांच्या हातावर शिक्के मारले जातील. तसेच जे रुग्ण नियम मोडतील त्यांना थेट कोविड सेंटर किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये भरती केले जाईल, असे काकाणी यांनी सांगितले.

सेल्फ टेस्ट किटची विक्रेत्यांना नोंद ठेवावी लागणार -

कोरोना चाचणीसाठी सेल्फ टेस्ट किटचा वापर केला जात आहे. या किट कोणाला विकल्या जातात कोण त्याच्या टेस्ट करतात. कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह याची माहिती मिळत नाही. यामुळे हे टेस्ट कोणाला विकले टायचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक डिस्ट्रिब्युटर आणि विक्रेत्यांना नोंद करावा लागणार आहे. तसे निर्देश पालिकेकडून देण्यात आल्याचे काकाणी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details