महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाडिया रुग्णालय प्रशासनाविरोधात चिमुकलीच्या पालकांचा काळी फीत बांधून निषेध - डॉक्टर

वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी गर्भातील बाळाला असलेले व्यंग वेळीच न ओळखल्यामुळे 42 दिवसांच्या बाळाला याचा फटका बसला आहे. रुग्णालय प्रशासनाचा फटका आमच्या बाळाला बसल्याचा आरोप परळ येथील रहिवासी पांचाळ दाम्पत्यांनीक केला आहे. तसेच रुग्णालय प्रशासनाविरोधात काळी फीत बांधून त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

वाडिया रुग्णालय प्रशासनाविरोधात निषेध

By

Published : May 19, 2019, 12:34 PM IST

मुंबई - गर्भातील बाळाला असलेले व्यंग वेळीच न ओळखल्यामुळे आमच्या ४२ दिवसांच्या बाळाला त्याचा फटका बसला आहे. वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजीपणामुळेच हा फटका बसल्याचा आरोप पांचाळ दाम्पत्यांनी केला आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाविरोधात पांचाळ कुटुंबीयांनी परळच्या कामगार मैदान येथील बाबू गेनू पुतळयाजवळ काळी फीत बांधून निषेध व्यक्त केला.

वाडिया रुग्णालय प्रशासनाविरोधात निषेध

अमित आणि श्रुतिका पांचाळ हे परळ येथील रहिवासी आहेत. लग्नानंतर पाच वर्षांनी गर्भवती राहिलेल्या श्रुतिकाने सुरुवातीपासूनच वाडिया रुग्णालयात उपचार घेतले. ८ महिने पूर्ण झाल्यानंतर श्रुतिका तपासणीसाठी गेली असता बाळाच्या डोक्याला सूज आली असल्याने डॉक्टरांनी तातडीने प्रसूती करण्यास सांगितले. त्यानुसार २८ मार्चला श्रुतिका यांची प्रसूती झाली आणि त्यांना मुलगी झाली.

जन्मत:च या मुलीच्या मेंदूमध्ये पाणी होते. तसेच या मुलीचा स्पाईन बिफिडा म्हणजेच मज्जारज्जू आणि पाठीचा मणका जोडलेले नाहीत. हा जन्मजात दोष या चिमुकलीच्या शरीरात आहे. परंतु, हा जन्मदोष असून यामध्ये मज्जारज्जूची वाढ झालेली नाही. याचा परिणाम मेंदूवरही होण्याची शक्यता असते. गर्भातील बाळामधील व्यंग निदर्शनास आणणारी अ‍ॅनोमॅलिस चाचणी न केल्याने बाळामधील व्यंग वेळेत समजू शकलेले नाही. ही चाचणी डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे केली गेली नाही, असा पांचाळ कुटुंबाचा आरोप आहे. मात्र, याबाबत वाडिया रुग्णालयाकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details