महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेने दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून मी राष्ट्रवादीत आलो - आमदार अमित लोडा - maharastra assembly election 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पालघरचे आमदार अमित लोडा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

अमित लोडा

By

Published : Oct 3, 2019, 5:41 PM IST

मुंबई- "माझे वडील आणि मी शिवसेनेसाठी अहोरात्र काम करत राहिलो. परंतु, माझ्या वडिलांनंतर शिवसेनेकडून मला समाधानकारक वागणूक मिळाली नाही. मला शिवसेनेकडून पुन्हा उमेदवारी देण्यात येईल, असा शब्द देण्यात आला होता. मात्र, सेनेने तो पाळला नाही. यामुळे माझा नाईलाज झाल्याने मी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे" अशी माहिती पालघरचे शिवसेना आमदार अमित लोडा यांनी दिली.

अमित लोडा

हेही वाचा-जोरदार शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरे कुटुंबीय उपस्थित

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पालघरचे आमदार अमित लोडा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 'माझ्या वडिलांचे यापूर्वी राजकीय संबंध हे राष्ट्रवादी काँग्रेसशी अत्यंत चांगले होते. परंतु, एक करिअर म्हणून मी शिवसेनेकडे गेलो होतो. या निवडणुकीत शिवसेनेने माझे करिअर थांबवण्याचा प्रयत्न केला. यामुळे शिवसेनेला सोडून मी राष्ट्रवादीमध्ये आलो' असल्याचेही लोढा म्हणाले.

हेही वाचा-राज्यात भाजप व शिवसेनेच्या विरुद्ध जनतेचा मोठा क्रोध : दिलीप वळसे-पाटील

'विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मला शिवसेनेकडून सांगण्यात आले की, आम्ही वेगळ्या कोणाला तरी शब्द दिला होता आणि तो शब्द आम्ही पाळणार असून तुम्हाला थांबावे लागेल. तुम्हाला उमेदवारी दिली जाणार नाही, असे सांगत मला उमेदवारी नाकारण्यात आली. यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून माझी व्यथा सांगितली. त्यानंतर त्यांनी मला आधार देत तुमचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीन वेळा आमदार होते. तुम्ही जर येत असाल तर आम्ही तुमचे स्वागत करू आणि सन्मान देऊ, असे आश्वासन दिले. त्यामुळे मी आज राष्ट्रवादीत आलो' असल्याचेही अमित लोडा म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details