मुंबई :त्यामुळे मीडियाला कोर्टात बंदी घालण्यात यावी तसेच व्हिडिओ शूटिंगद्वारे खटल्याची रेकॉर्डिंग करण्यात यावी असा धक्कादायक दावा आणि मागणी प्रसाद पुरोहित यांनी केला आहे. (Latest news from Mumbai)प्रसाद पुरोहित यांनी मुंबई सत्र न्यायालयात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात (Malegaon blast case) दरम्यान सुनावणी सुरू असताना पत्रकारांना कोटरूममध्ये येण्यास बंदी घालण्यात यावी याकरिता अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज युक्तिवाद करताना प्रसाद पुरहित (claim of Prasad Purohit in court) यांनी हा धक्कादायक खुलासा केला आहे. (Pakistani ISI is making web series) प्रसाद पुरोहित यांच्या अर्जाला या प्रकरणातील सह आरोपी समीर कुलकर्णी यांनी विरोध केला आहे. (Mumbai Crime) आता या प्रकरणात न्यायालय 9 जानेवारी रोजी निर्णय देणार आहे. (Latest news from Mumbai)
Malegaon Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर पाकिस्तानी आयएसआय बनवतेय वेब सिरीज; प्रसाद पुरोहित यांचा कोर्टात धक्कादायक दावा - मालेगाव बॉम्बस्फ़ोट प्रकरण
मालेगाव बॉम्बस्फ़ोट प्रकरणातील (Malegaon blast case) आरोपी निलंबित लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (claim of Prasad Purohit in court) यांनी सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टामध्ये प्रत्यक्ष युक्तिवाद करताना दावा केला की, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मीडियाच्या बातम्यांवर आयएसआय वेब सिरीज तयार करत (Pakistani ISI is making web series) आहे. (Mumbai Crime)
प्रसाद पुरोहितवर आधारित कॅरेक्टर :भारतातील मीडियावर प्रसारित बातम्यांचा वापर पाकिस्तानी गुप्तचर संघटना ISI करत आहे. यावर पाकिस्तानात वेबसिरीज तयार केल्या जातात आणि भारताची प्रतिमा मलीन होते, असा प्रसाद पुरोहित यांनी कोर्टात दावा केला आहे. पाकिस्तानात तयार होणाऱ्या वेबसिरीजचा व्हिडिओही प्रसाद पुरोहितने कोर्टात मोबाईलद्वारे दाखविला. या व्हिडिओतील सिरीजमध्ये प्रसाद पुरोहितवर आधारीत कॅरेक्टर असल्याचाही दावा केला आहे.
काय आहे प्रकरण ?29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. शुक्रवारच्या नमाजानंतर मशिदीत मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. याप्रकरणी एटीएसने प्राथमिक चौकशी केली होती. तीन वर्षांनंतर 2011 मध्ये हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्यात आले. एनआयएच्या विशेष न्यायालयात आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. भोपाळमधील भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर या या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी, अजय रहीरकर आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे.