महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai : मंत्रालयाच्या आवारात लागणार महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे तैलचित्र - तैलचित्राचे अनावरण

मंत्रालयाच्या आवारात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे तैलचित्र लावण्यात यावे, अशी मागणी बऱ्याचं काळापासुन जोर धरत होती. अखेर, मंत्रालयाच्या आवारात तैलचित्र दिसणार, (Painting Of Mahatma Jyotiba Phule and Savitribai Phule ) हे आता स्पष्ट झाले आहे.

Mumbai
मंत्रालयाच्या आवारात लागणार महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे तैलचित्र

By

Published : Nov 27, 2022, 7:53 PM IST

मुंबई :महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र मंत्रालयात मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात यावे, अशी मागणी सातत्याने गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. अखेर, मंत्रालयाच्या आवारात तैलचित्र दिसणार. 28 नोव्हेंबरला तैलचित्राचे अनावरण (Unveiling of painting) होईल.

आता ती मागणी पूर्ण झाली असून 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे (Painting Of Mahatma Jyotiba Phule and Savitribai Phule) अनावरण करण्यात येणार आहे. चित्रकार राजेश सावंत यांनी तयार केलेल्या तैलचित्राचं 28 नोव्हेंबरला सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण केलं जाईल.

छगन भुजबळांच्या पाठपुराव्याला यश : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अनेक वर्षे सातत्याने महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत लावण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यामुळे 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला छगन भुजबळ यांना देखील आमंत्रित करण्यात आलं आहे. सध्या मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत प्रवेश करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र समोरच लावण्यात आले आहे. या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करून प्रत्येक जण मंत्रालयात आपल्या कामासाठी प्रवेश करत असतो.

ABOUT THE AUTHOR

...view details