महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Tatyarao Lahane Resign: तात्याराव लहाने यांच्यासह ९ वरिष्ठ डॉक्टरांचे राजीनामे, 750 डॉक्टर संपावर..जेजे रुग्णालयाचे कामकाज सलाईनवर! - डॉक्टर तात्याराव लहाने राजीनामा

जेजे रुग्णालयात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह ९ डॉक्टरांनी राजीनामे दिल्यानंतर जेजे रुग्णालयातील वाद चव्हाट्यावर आला आहे. दुसरीकडे मार्डचे डॉक्टरदेखील संपावर जाणार आहेत. त्यामुळे जेजे रुग्णालयातील नेत्रविभाग बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे.

Tatyarao Lahane Resign
तात्यारावर लहाने यांच्यासह ९ वरिष्ठ डॉक्टरांचे राजीनामे

By

Published : Jun 1, 2023, 9:12 AM IST

Updated : Jun 1, 2023, 10:07 AM IST

मुंबई :जेजे रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रागिनी पारेख आणि वरिष्ठ डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह ९ जणांनी पदाचे तडकाफडकीचे राजीनामे दिले आहेत. नेत्र विभागातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या निवासी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीवरून तसेच निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेच्या दबावामुळे त्यांनी राजीनामे दिल्याचे बोलले जात आहे.



नेत्र विभागाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या निवासी डॉक्टरांनी जेजेमधील वरिष्ठ डॉक्टरांविरोधात नियमभंगाची तक्रार केली होती. या तक्रारीविरोधात चौकशी करत नेत्ररोग चिकत्साविभागाने यावर स्पष्टीकरण दिले होते. मात्र, वादावर तोडगा निघाला नसल्याने मार्डने संपाचे हत्यार उगारले आहे. उद्वीग्न होऊन डॉक्टर लहाने, डॉक्टर रागिणी पारेख यांच्यासह ९ डॉक्टरांनी पदाचे राजीनामे दिले आहेत.

निवासी डॉक्टरांच्या आरोपामध्ये तथ्य नाही. लहानेंनी लावलेले आरोप चुकीचे आहेत. डॉक्टर तात्या लहाने यांच्यासह ९ डॉक्टरांचे राजीनामे आले नाहीत. याबाबत माध्यमातून कळालेले आहे. रुग्णसेवेवर परिणाम झालेला नाही- जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता पल्लवी साबळे

नेत्रचिकित्सा विभाग बंद पडण्याच्या मार्गावर:वरिष्ठ डॉक्टरांचे राजीनामे आणि मार्डच्या डॉक्टरांचा संप यामुळे आता जे जे रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभाग बंद पडण्याच्या मार्गावर आहे. केवळ सहा महिन्यांपूर्वीच रुग्णालयात रुजू झालेल्या निवासी डॉक्टरांच्या या दबावामुळं डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. मार्डकडून डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यावर दबाव वाढत होता. यासंबंधी तक्रारींची चौकशी होऊन काहीही निष्पण्ण झाले नसल्याचे विभागाने स्पष्ट केले. तसेच विभागप्रमुख रागिनी पारीख यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे.



मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानामुळे प्रसिद्ध झाले लहाने-डॉक्टर तात्याराव लहाने यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियान चालविले आहे. तसेच अनेक गरीब रुग्णांवर मोफत उपचार व हजारो शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत. जेजे रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागाचे यामुळे जगभरात नाव झाले आहे.
सेवानिवृत्तीनंतरही डॉक्टर लहाने व सर्व अध्यापक रात्रंदिवस रुग्ण सेवा देत आहेत. तरीसुद्धा त्यांचे वेतन अद्यापही अधिष्ठाता यांनी अदा केलेले नाही. तसेच त्यांना शासकीय निवास स्थानासाठी ७ लाख रुपये दंड लावून ते निवासस्थान सोडण्यास सांगण्यात आले. अशा परिस्थितीत द्धा केवळ रुग्णांशी असलेल्या बांधिलकीमुळे ते जेजेमध्ये काम करीत आहेत.

  • राजीनामा दिलेले डॉक्टर -
  • डॉ. तात्याराव लहाने
  • डॉ. रागिणी पारेख
  • डॉ. टिम सॅल्मन
  • डॉ. स्वरणजीत सिंग भट्टी
  • डॉ. अश्विन बाफना
  • डॉ. हेमालिनी मेहता
  • डॉ. शशी कपूर
  • डॉ दीपक भट
  • डॉ. सायली लहाने

    आरोग्यावर विपरीत परिणाम -या संपूर्ण प्रकरणावर बोलताना डॉक्टर लहाने आणि सांगितले आहे की, आम्ही सर्व प्राध्यापक व विभाग प्रमुख तसेच या विभागामध्ये काम करत असलेले सर्व अध्यापक खूप मानसिक तणावातून जात आहोत. या कारणास्तव आमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी आम्ही सर्व अध्यापक आमच्या पदावरून ३१ मे २०२३ रोजी राजीनामा देत आहोत. यापुढेही रुग्णसेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी आम्ही काही मागण्या केल्या आहेत.

अनेक वर्षापासून नको त्या कारणाने अनेक आरोप करण्यात आले. यंदासुद्धा करण्यात आलेल्या प्रत्येक आरोपाला आम्ही सविस्तर उत्तर दिले आहे. तरीही वाढता दबाव पाहता आम्हाला राजीनामा देणे भाग आहे-डॉ. तात्याराव लहाने

  1. गेल्या वर्षभरापासून त्रास देणाऱ्या अधिष्ठाता यांच्याविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात यावी.
  2. इतर निवासी डॉक्टरांना भडकाविणाऱ्या डॉ. सार्बिक डे, डॉ. संस्कृती प्रसाद व डॉ. स्मृती पांडे या तिन्ही निवासी डॉक्टरांचे पी जी रजिस्ट्रेशन रद्द करावे. इतर निवासी डॉक्टरांना बेशिस्त वर्तन केल्याबददल कडक समज द्यावी.
  3. डॉ. रागिणी पारेख यांनी गेल्या २८ वर्षात रात्रदिवंस काम केले आहे. त्यांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर करावी.
  4. त्याचप्रमाणे सर्व अध्यापकांचे राजीनामे मंजूर करुन त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे.
Last Updated : Jun 1, 2023, 10:07 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details