मुंबई -कोरोनाच्या वेगाने वाढणार्या संसर्गामुळे नागरिक रुग्णालयात बेड, औषधी आणि ऑक्सिजन न मिळाल्याच्या समस्यांशी झगडत आहेत. अशात दादर येथील श्री. गुरू सिंग सभा गुरुद्वारा समितीने कोरोना संक्रमित रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. गरजूंसाठी धान्यवाटप, तर दुसरीकडे ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था त्यांनी केली आहे. याबाबत 'ईटीव्ही भारतचा' विशेष रिपोर्ट.
हेही वाचा -राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
विनामुल्य ऑक्सिजन लंगर सेवा
ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल होऊ नयेत, रुग्णांचे आरोग्य जपता यावे, त्यांना वेळेत ऑक्सिजन मिळावे यासाठी दादर पूर्व येथील श्री. गुरू सिंग सभा गुरुद्वारा समितीने पुढाकार घेतला असून विनामुल्य ऑक्सिजन लंगर सेवा सुरू केली आहे. त्यामुळे, अनेक रुग्णांना दिलासा मिळत आहे. एकीकडे ऑक्सिजन अभावी कोणाचे हाल होऊ नयेत त्यांना ऑक्सिजन वेळेत मिळावेत यासाठी सेवा पुरवित असताना दुसरीकडे कोणी उपाशी राहू नये याची दखल घेत गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील गुरुद्वाराच्या वतीने करण्यात येत आहे. गरजूंना वेळेत ऑक्सिजन मिळावे यासाठी छोटे आणि जम्बो, असे एकूण 80 ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केले असून अजूनही ऑक्सिजन सिलिंडर मागविले असल्याचे श्री. गुरु सिंग सभा गुरुद्वाराचे अध्यक्ष रघबीर सिंग गिल यांनी सांगितले.