महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्राच्या मदतीसाठी भारतीय रेल्वेची 'ऑक्सिजन एक्सप्रेस' धावणार

वाढत्या कोरोनाग्रस्तांमुळे वैद्यकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहेत. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे इतर राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. रेल्वे मंत्रालयाने याची दखल घेत राज्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहेत.

mum
ऑक्सिजन एक्सप्रेस

By

Published : Apr 18, 2021, 7:14 PM IST

मुंबई -वाढत्या कोरोनाग्रस्तांमुळे वैद्यकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहेत. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे इतर राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. रेल्वे मंत्रालयाने याची दखल घेत राज्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहेत.

महाराष्ट्रातून जाणार दहा टँकर

महाराष्ट्रातील ऑक्सिजनची वाढती मागणी आणि त्याची उपलब्धता पाहता अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतेच केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला असून पूर्ण तयारीही केली आहेत. 19 एप्रिलला कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेने ही ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना होणार आहे. दहा टँकर महाराष्ट्रातून जाणार असल्याची, माहिती रेल्वे मंत्रालयाने आपल्या प्रसिद्धी पत्रात दिली आहे.

रेल्वेची तयारी पूर्ण

महाराष्ट्रातील ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेता भारतीय रेल्वेने तातडीने तयारी केली होती. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडरच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार केला जाणार आहे. कळंबोली रेल्वे स्टेशनहून दहा रिकामे टँकर्स वायझॅक, जमशेदपूर, रौरकेला, बोकारो येथे रवाना होणार आहेत. तेथून ऑक्सिजन भरुन पुन्हा ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल होणार आहेत.

हेही वाचा -जे.जे.रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार कधी होणार? राज्यातील इतर कोविड रुग्णालायांवर ताण

ABOUT THE AUTHOR

...view details