महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता.. दुपारी २ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर... - आंतरजातीय विवाह

मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलगी व जावई या पती-पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडली आहे. जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा कहर सुरुच असून, पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन गेल्या २४ तासात नक्षलवाद्यांनी दोघांची हत्या केली आहे. ओडिशात फनी चक्रीवादळाच्या बळींची संख्या ५ मे अखेर २९ वर पोहोचली आहे. रशियात प्रवासी विमानाला लागलेल्या आगीत ४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या तुरुंगातून राजस्थानच्या  तरुणाची ६ वर्षांनी सुटका झाली.

नगर

By

Published : May 6, 2019, 1:59 PM IST

नगरमध्ये 'सैराट'.. आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी व जावयाला घरात कोंडून पेटवले

अहमदनगर - मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलगी व जावई या पती-पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याची घटना पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडली आहे. शनिवारी घडलेल्या या जळीत कांडातील पती-पत्नी दोघेही पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार घेत असताना पत्नी रुख्मिणी रणसिंह हिचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. तर पती मंगेश रणसिंह यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक जण फरार आहे.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2H44kem

नक्षलवाद्यांचा कहर सुरुच.. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन २४ तासात दुसरी हत्या

गडचिरोली - जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा कहर सुरुच असून, पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन गेल्या २४ तासात नक्षलवाद्यांनी दोघांची हत्या केली आहे. रविवारीच भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी एकाची हत्या केली होती. त्यानंतर आज एटापल्ली तालुक्यातील बांडे गावालगत एकाची हत्या केली आहे. शिशिर सरकार असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2LoLYJb

ओडिशात फनी चक्रीवादळाचे २९ बळी, केंद्राची १ हजार कोटींच्या मदतीची घोषणा

नवी दिल्ली - ओडिशात फनी चक्रीवादळाच्या बळींची संख्या ५ मे अखेर २९ वर पोहोचली आहे. यापैकी केवळ पुरी येथील २१ बळी आहेत. केंद्र सरकारने ओडिशात अत्यंत गंभीर स्थिती असल्याचे सांगत राज्याला १ हजार कोटींची मदत देत असल्याचे जाहीर केले आहे. येथे ३ मे रोजी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला होता. मागील २ दिवसांत ओडिशा किनारपट्टीवरील स्थिती अत्यंत गंभीर होती. पिण्याच्या पाण्याची कमतरता, वीज खंडित झाल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. एकंदरित १ कोटी लोकांना याचा फटका बसला आहे.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/300t1jt

रशियात प्रवासी विमानाला आग; ४१ प्रवाशांचा मृत्यू

मॉस्को - रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये एका प्रवासी विमानाला आपातकालीन लँडिंग करताना अचानक आग लागली. या दुर्घटनेत ४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मॉस्कोच्या शेरिमीमेटयेवो विमानतळावर विमानाचे लँडिंग होत असताना विमानाच्या मागच्या बाजूने अचानक पेट घेतला. एअरोफ्लोट एअरलाइन्स कंपनीचे हे विमान होते.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2Vieh0n

पाकिस्तानच्या तुरुंगातून 'तो' ६ वर्षांनी परतला; चुकून ओलांडली होती वाघा बॉर्डर

बुंडी - पाकिस्तानच्या कराचीमधील तरुंगात कैदेत असलेला तरुण रविवारी मायदेशी परतला. पाकिस्तानच्या तो ६ वर्षे कैदेत होता. राजस्थानच्या बुंडी जिल्ह्यातील झाकमुंडा रामापुरीया या गावचा हा तरुण रविवारी त्याच्या घरी दाखल झाला. सहा वर्षांनी आणि तेही पाकिस्तानच्या कैदेतून सहीसलामत परत आल्याने नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जुगराज भिल असे त्या तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2Wsz51J

ABOUT THE AUTHOR

...view details