महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अॅन्टीबायोटिक्स औषधांच्या सेवनाने पसरू शकतो 'सुपरबग्ज'; नेहरू सायन्स सेंटरमध्ये प्रदर्शनातून जनजागृती - nehru science center

अॅन्टीबायोटिक्सच्या अपुर्‍या डोसमुळे शरीरात सुपरबग्ज हा विषाणू तयार होतो. या विषाणूविरोधात लढा देण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे. या विषाणूमुळे दरवर्षी भारतात सात लाखांपेक्षा अधिक जणांना आपला जीव गमवावा लागत आहे. यसंबंधात जनजागूती करणारे ‘सुपरबग्ज : द एंड ऑफ अॅन्टीबायोटिक्स?’ हे प्रदर्शन नेहरू सायन्स सेंटरमध्ये भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन 17 डिसेंबरपासून सुरू झाले असून दोन महिने चालणार आहे.

anti
नेहरू सायन्स सेंटरमध्ये ‘सुपरबग्ज : द इंड ऑफ अॅन्टीबायोटिक्स?’ प्रदर्शन

By

Published : Dec 19, 2019, 9:19 AM IST

मुंबई - अॅन्टीबायोटिक्स गोळ्यांच्या वापरामुळे आजार काही कालावधीत बरा होत असला तरीही या गोळ्यांमुळे होणारे शारीरिक नुकसान मोठे आहे. या औषधांचे सेवन करणाऱ्या रुग्णांना 'सुपरबग्ज' या विषाणूचा प्रदुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे रूग्णाचा मुत्युदेखील होऊ शकतो, असे एका संशोधनातून समोर आले आहे. सुपरबग्ज या विषाणूविरोधात भारत आणि इंग्लंडने एकत्र येत ‘सुपरबग्ज : द एंड ऑफ अ‍ॅण्टिबायोटिक्स?’ या जनजागृती मोहीमेचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरमध्ये सुपरबग्ज विषाणूबाबत जनजागृती करण्यासाठी प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

नेहरू सायन्स सेंटरमध्ये ‘सुपरबग्ज : द इंड ऑफ अॅन्टीबायोटिक्स?’ प्रदर्शन

अॅन्टीबायोटिक्सच्या अपुर्‍या डोसमुळे शरीरात सुपरबग्ज हा विषाणू तयार होतो. या विषाणूविरोधात लढा देण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे. या विषाणूमुळे दरवर्षी भारतात सात लाखांपेक्षा अधिक जणांना आपला जीव गमवावा लागत आहे. तर पुढील 30 वर्षात हा आकडा एक कोटीच्या घरात जाण्याची शक्यता ज्येष्ठ डॉ. फारूख उडवाडीया यांनी व्यक्त केली आहे. ‘सुपरबग्ज : द एंड ऑफ अॅन्टीबायोटिक्स?’ हे प्रदर्शन नेहरू सायन्स सेंटरमध्ये भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन 17 डिसेंबरपासून सुरू झाले असून दोन महिने चालणार आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या अॅन्टीबायोटिक्स औषधांमुळे आराम पडू लागला की, ती औषधे घेणे रुग्णांकडून बंद केले जाते. त्यामुळे औषधांचा कालावधी पूर्ण केला जात नाही. काही जण डॉक्टरांच्या सल्लाशिवाय गोळ्या घेतात. परिणामी कालांतराने अॅन्टीबायोटिक्सचा आजाराच्या विषाणूंवर कोणताही परिणाम होत नाही. अॅन्टीबायोटिक्सच्या अपुर्‍या डोसमुळे शरीरामध्ये अॅन्टीमायक्रोबियल रेझिस्टन्स (एएमआर)तयार होतात. शरीरात वाढत जाणारे या एएमआरचे कालांतराने अॅन्टीबॅक्टेरियल रेझिस्टन्समध्ये रुपांतर होऊन सुपरबग्ज हा महाभयंकर विषाणू तयार होतो. यावर कोणत्याही अॅन्टीबायोटिक्स औषधाचा परिणाम होत नाही. नागरिकांना असलेली अपुरी माहिती, गैरसमज यामुळे दरवर्षी सुपरबग्जमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू होत आहे.

हेही वाचा -लोकसंख्येची अन्नग्रहण करण्याची क्षमता वाढतेय!

मुंबईनंतर बंगळूर आणि कोलकाता या शहरांमध्ये देखील हे प्रदर्शन होणार आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये दिल्ली येथे हे प्रदर्शन झाले होते. सुपरबग्ज विषाणूची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी ठाणे जिल्ह्यातील 1200 शाळांशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच पथनाट्य, नाटक यांमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातही याबाबत जनजागृती व्हावी यासाठी 'मोबाईल सायन्स व्हॅन'च्या पर्यायाचा विचार करत असल्याची माहिती नेहरू सायन्स सेंटरचे संचालक शिवप्रसाद खेणेद यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details