महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 969 नवे रुग्ण, 70 मृत्यू, कोरोनाग्रस्तांचा आकडा 94, 863 वर - mumbai corona deaths news

मुंबईत आज 969 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून 70 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे, मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 94 हजार 863 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 5402 वर पोहोचला आहे. तर, आज उपचाराअंती बरे झालेल्या 1 हजार 11 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 66 हजार 633 वर पोहोचला आहे.

मुंबईत कोरोनाचे 969 नवे रुग्ण
मुंबईत कोरोनाचे 969 नवे रुग्ण

By

Published : Jul 14, 2020, 10:21 PM IST

मुंबई : कोरोना विषाणूचे मुंबईत आज (मंगळवार) नवे 969 रुग्ण आढळून आले असून 70 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 94 हजार 863 वर तर मृतांचा आकडा 5 हजार 402 वर पोहोचला आहे. मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांवर तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 52 दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 94 हजार 863 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 5402 वर पोहोचला आहे. तर, आज उपचाराअंती बरे झालेल्या 1 हजार 11 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 66 हजार 633 वर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 22 हजार 828 सक्रिय रुग्ण आहेत. आज 70 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 70 मृत्यूपैकी 56 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 49 पुरुष आणि 21 महिला रुग्ण होत्या.

मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, रुग्णवाढीचा दर 1.34 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 52 दिवस इतका आहे. मुंबईत सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशा 732 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभागात कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहेत. तर, कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 6 हजार 751 इमारतींमधील काही माळे, काही विंग तर काही इमारती पूर्ण सील करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनाचे निदान करण्यासाठी 401741 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details