महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात आज 51 हजार 315 तर आतापर्यंत 10 लाख 80 हजार 675 लाभार्थ्यांचे लसीकरण - corona vaccination in maharashtra

राज्यात आज 51 हजार 315 आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यात आली.

Over 51 thousand health, frontline workers vaccinated today in Maharashtra
राज्यात आज 51 हजार 315 तर आतापर्यंत 10 लाख 80 हजार 675 लाभार्थ्यांचे लसीकरण

By

Published : Feb 24, 2021, 10:34 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूची लागण होऊ नये, विषाणूपासून संरक्षण व्हावे म्हणून 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. त्याअनुषंगाने राज्यात आज 51 हजार 315 आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत 10 लाख 80 हजार 675 लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड व को-वॅक्सिन ही लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

लसीकरणाची आकडेवारी -
राज्यात आज 817 केंद्रांवर 51 हजार 315 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यापैकी 29 हजार 156 लाभार्थ्यांना पहिला तर 22 हजार 159 लाभार्थ्यांना दुसरा लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 8 हजार 850 आरोग्य आणि 20 हजार 306 फ्रंट लाईन वर्कर लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तसेच 22 हजार 159 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 49 हजार 993 लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड लसीद्वारे लसीकरण करण्यात आले. 1 हजार 322 लाभार्थ्यांना को-वॅक्सिन ही लस देण्यात आली. आजपर्यंत 10 लाख 80 हजार 675 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

जिल्हानिहाय आकडेवारी -
अहमदनगर 36 हजार 954
अकोला 13 हजार 187
अमरावती 24 हजार 022
औरंगाबाद 27 हजार 051
बीड 20 हजार 706
भंडारा 13 हजार 281
बुलढाणा 17 हजार 489
चंद्रपूर 21 हजार 976
धुळे 13 हजार 784
गडचिरोली 13 हजार 495
गोंदिया 13 हजार 711
हिंगोली 6 हजार 919
जळगांव 24 हजार 517
जालना 15 हजार 654
कोल्हापूर 31 हजार 430
लातूर 19 हजार 107
मुंबई 1 लाख 94 हजार 207
नागपूर 50 हजार 679
नांदेड 16 हजार 393
नंदुरबार 16 हजार 091
नाशिक 45 हजार 400
उस्मानाबाद 11 हजार 612
पालघर 27 हजार 178
परभणी 8 हजार 884
पुणे 10 हजार 8055
रायगड 16 हजार 590
रत्नागिरी 16 हजार 364
सांगली 26 हजार 641
सातारा 41 हजार 247
सिंधुदुर्ग 9 हजार 470
सोलापूर 34 हजार 817
ठाणे 97 हजार 218
वर्धा 19 हजार 865
वाशिम 8 हजार 169
यवतमाळ 18 हजार 512
एकूण 10 लाख 80हजार675

ABOUT THE AUTHOR

...view details