महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Criminal Money : प्रविण राऊतांना मिळालेले 50 लाख गुन्हेगारी स्वरुपाचे, ईडी दोषारोपपत्रात माहिती - गुरुआशिष कन्स्ट्रक्शन्स

शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक (Arrested in financial malpractice case) केली. या प्रकरणात ईडीने मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले आहे. यात ईडीने म्हटले आहे की, प्रवीण राऊत यांना मिळालेल्या रक्कमेपैकी 50 लाख रुपयांची रक्कम ही गुन्हेगारी (Out of the amount received by Pravin Raut, Rs 50 lakh is criminal) स्वरूपाची होती.

Pravin Raut
प्रविण राऊत

By

Published : Apr 9, 2022, 9:19 AM IST

मुंबई:अंमलबजावणी संचालनालय - ईडीने गुरुआशिष कन्स्ट्रक्शन्सचे (Guruashish Constructions) माजी संचालक प्रवीण राऊत यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा (Sanjay Raut's wife Varsha) यांनी सांताक्रूझ येथे इमारत बांधणाऱ्या भागीदारी कंपनीमध्ये 5,625 रुपयांच्या गुंतवणुकीतून 14 लाख रुपयांचा नफा कमावला. पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळ्याच्या संदर्भात ईडीने अटक केलेल्या प्रवीण राऊतने ईडीला दिलेल्या जाबाबत खुलासा केला आहे की. वर्षा राऊत तसेच प्रवीण राऊतची पत्नी माधुरी राऊत, समीर कावळे, प्रतिमा केळेकर आणि मेघाजी पटेल यांच्यासह अवनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भागीदार होत्या. कंपनीने एक पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आणि सांताक्रूझ पश्चिमेला एक छोटी इमारत बांधली होती.


प्रवीण राऊत यांनी ईडीला दिलेल्या माहितीनुसार वर्षा राऊत यांनी कंपनीमध्ये 5,625 ची गुंतवणूक केली होती आणि 14 लाखांचा नफा कमावला होता, तर माधुरी राऊतने 13.05 लाख गुंतवले होते आणि 14 लाखांचा नफा कमावला होता. केळेकर, ज्यांनी 10 लाखांची गुंतवणूक केली होती त्यांना 28 लाखांचा नफा झाला होता. ईडी ने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, राकेश कुमार वाधवान, सारंग कुमार वाधवान, प्रवीण आणि इतरांविरुद्ध मार्च 2018 मध्ये नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे मनी-लाँडरिंगची चौकशी सुरू केली. हा एफआयआर महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण - म्हाडाच्या अधिकाऱ्याने दाखल केलेल्या तक्रारीवर आधारित आहे.

5 एप्रिल रोजी ईडीने 11.15 कोटी किमतीची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. ज्यात वर्षा राऊत यांच्याकडे असलेला दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग जवळील किहीम येथील जमीन, तसेच स्वप्ना पाटकर यांच्या पुनर्विकासाच्या चौकशीचा भाग म्हणून संयुक्तपणे ताब्यात घेण्यात आली. स्वप्ना या एका सेनेच्या नेत्याचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत. यात प्रवीण राऊतच्या मालकीच्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील सफाळे आणि पडघा गावातील काही जमिनीचे भाग आहे.

कंपनीने गोरेगाव येथील पत्रा चाळमधील 672 भाडेकरूंच्या पुनर्वसनासाठी बांधकाम प्रकल्प हाती घेतला होता. प्रवीणला या प्रकरणात 2 फेब्रुवारीला अटक करण्यात आली. ईडीने सांगितले की त्यांच्या तपासणीत असे दिसून आले की रिअल इस्टेट कंपनी, एचडीआयएल कडून सुमारे 100 कोटी प्रवीणच्या खात्यात हस्तांतरित केले गेले, ज्याने या निधीतील काही भाग त्याच्या जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य आणि व्यावसायिक संस्थांच्या विविध खात्यांमध्ये वळवले.

2010 मध्ये वर्षाला 83 लाख रुपयांच्या रकमेचा काही भाग माधुरीकडून प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे प्राप्त झाला होता. ही रक्कम वर्षा यांनी दादर येथे फ्लॅट खरेदी करण्यासाठी वापरली होती. ईडीने तपास सुरू केल्यानंतर वर्षाने माधुरीला 55 लाख परत हस्तांतरित केल्याचे समोर आले आहे. ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यावर देखील दोषारोपपत्रात अनेक आरोप केल्यामुळे संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : INS Vikrant Case : आयएनएस विक्रांत प्रकरणात सोमय्या पिता-पुत्रांला मुंबई पोलिसांची समन्स

ABOUT THE AUTHOR

...view details