महाराष्ट्र

maharashtra

आमची लढाई सुरूच राहणार; आनंद परांजपे यांनी मांडले कार्यकर्ते आणि मतदारांचे आभार

By

Published : May 25, 2019, 9:35 AM IST

लोकसभेत तब्बल 4 लाखांहून अधिक मतांनी पराभूत झालेले आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी आपली लढाई सुरूच राहील, असे विधान आनंद परांजपे यांनी झाले.

आनंद परांजपे

ठाणे- लोकसभेत तब्बल 4 लाखांहून अधिक मतांनी पराभूत झालेले आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी आपली लढाई सुरूच राहील, असे विधान करीत कार्यकर्त्यांनी न डगमगता विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे.

संग्रहीत


पराभवाची कारणमिमांसा करण्यात येणार असून यासाठी बूथनुसार यादीवर काम करण्यात येईल, असे देखील परांजपे यांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झालेल्या पराभवाने खचून जाऊ नये. असे सांगत येणाऱ्या विधानसभेची तयारीला लागूया अशा सूचना परांजपे यांनी दिल्या.

ठाणे लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे आणि युतीचे उमदेवार राजन विचारे यांच्यात चांगलीच चुरस रंगली होती. एकतर्फी समजली जाणाऱ्या निवडणुकीत परांजपे यांनी विचारेंना चांगलाच घाम फोडला होता. दरम्यान या निवडणुकीत शिक्षणाच्या मुद्यावरून चांगलेच राजकारण तापले होते. मात्र, मतदारांनी विचारे यांनाच पसंती देऊन विजयी केले. विचारे यांच्या विजयानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. मात्र, आता नाराजी व्यक्त करून काहीही होणार नसुन पुन्हा एकदा कामाला लागण्याचे आवाहन आनंद परांजपे यांनी केले.

लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांसह उमेदवार आनंद परांजपे यांनी चांगलीच मेहनत घेतली होती. दरम्यान भौगोलिक दृष्ट्या ठाणे लोकसभा मतदार संघ सर्वात मोठा असल्याने ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपापले कामे वाटून घेतली होती. तर काही ठिकाणी परांजपे यांच्या अनुपस्तितीत देखील मैदान, चौकसभा, प्रचार गाजवला होता. तर काही कार्यकर्त्यांनी पदरचे पैसे मोडून प्रचंड मेहनत घेतली होती. भर उन्हात भूक, तहान विसरून कार्यकर्त्यांनी प्रचाराचा झंजावात शेवटपर्यंत सुरू ठेवला होता. मात्र, पदरी निराशाच आल्याने कार्यकर्त्यांना उत्साह कमी झाला असल्याने आपल्याला आता पुन्हा कामाला लागा, असे सांगत परांजपे यांनी आघाडीच्या सर्व कार्यकर्ते मतदारांचे आभार मानले. दरम्यान, माझी लढाई सुरुच राहणार असून येणाऱ्या विधानसभेच्या तयारीला लागूया असे सूचित केले.

ABOUT THE AUTHOR

...view details