मुंबई : मुंबईतील आरोग्य सेविकांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. किमान वेतन, निवृत्ती वेतन, सहा महिने झाल्यावर एक दिवसाचा ब्रेक बंद करावा आदी मागण्यांसाठी ( Health Workers of BMC Met CM Eknath Shinde ) राज्य सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी मुंबईमधील आरोग्य सेविकांनी ( Warning Given on Behalf of Health Workers ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मागण्यांबाबत लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
BMC Health Workers : .....अन्यथा आरोग्य सेविकांचा आंदोलनाचा इशारा; मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
मुंबई महापालिकेच्या महिला आरोग्य सेविकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ( Health Workers of BMC Met CM Eknath Shinde ) भेट घेऊन निवेदन दिले आहे. त्यांनी निवेदनाद्वारे त्यांच्या ( Warning Given on Behalf of Health Workers ) मागण्या मान्य करण्याची अट घातली आहे, अन्यथा आंदोलनाचा सरकारला इशारा दिला आहे. किमान वेतन, निवृत्ती वेतनामधील त्रुटी इत्यादी मागण्या त्यांनी निवदेनाद्वारे केल्या.
आरोग्य सेविकांच्या मागण्या :मुंबईमध्ये घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करणे, लहान बालकांना लस, गोळ्या देणे, कोरोना काळात घराघरात जाऊन रुग्णांची माहिती गोळा करणे, क्षय, कुष्ठरोग निर्मुलन, गोवरचे लसीकरण अशी विविध कामे ४ हजार आरोग्य सेविकांकडून केले जाते. मात्र त्यांना तुटपुंजे मानधन दिले जाते. त्यांना अद्याप किमान वेतन लागू करण्यात आलेले नाही. आरोग्य सेविकांना व्हेंडर म्हणून नोंद करण्यात आले आहे ते रद्द करावे. २०१५ साली नेमणूक झालेल्या आरोग्य सेविकांना सहा महिन्याने १ दिवसाचा सेवाखंड (ब्रेक) दिला जातो, तो बंद करावा, अशा विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आरोग्य सेविकांनी आंदोलन केले आहे.
अन्यथा आंदोलन :राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे सरकार आले आहे. हे सरकार आपल्या मागण्या पूर्ण करेल अशी अपेक्षा आरोग्य सेविकांना आहे. यासाठी आरोग्य सेविका आणि संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीदरम्यान आरोग्य सेविकांनी निवेदन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी अधिवेशनानंतर बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिल्याचे महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ऍड. प्रकाश देवदास यांनी सांगितले. त्यानंतरही आरोग्य सेविकांच्या प्रश्न सुटला नाही तर आंदोलन करावे लागेल असा इशारा आरोग्य सेविकांनी दिला आहे.