ठाणे : भिवंडी शहरात राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या वातावरण निर्मितीसाठी भिवंडी शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नारपोली चौक ते स्वर्गीय आनंद दिघे चौकापर्यत शेकडो बाईकसह रॅली काढण्यात ( bike rally in Bhivandi )आली.
Bharat Jodo Yatra : भिवंडीत ‘भारत जोडो’ यात्रेच्या वातावरण निर्मितीसाठी बाईक रॅलीचे आयोजन.. - Organizing a bike rally
भिवंडी शहरात राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या वातावरण निर्मितीसाठी भिवंडी शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नारपोली चौक ते स्वर्गीय आनंद दिघे चौकापर्यत शेकडो बाईकसह रॅली काढण्यात ( bike rally in Bhivandi) आली.
राज्यात विविध उपक्रम राबवून जनजागृती - एकेकाळी भिवंडी शहर कॉग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा, मात्र गटातटाच्या राजकारणामुळे कॉग्रेसमध्ये फूट पडून गेल्या महापालीकेतील महापौर पदाच्या निवडणुकीत १८ नगरसेवक राष्ट्रवादीत गेले. शिवाय शहरात भाजप - समाजवादीच्या दोन आमदारांमुळे कॉग्रेसचे अस्थित्व टिकून ठेवण्यासाठी कॉग्रेस पदधकाऱ्यांनी कंबर कसली आहे. त्यातच राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा विदर्भात १५ नोव्हेंबरला येत आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यात विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे.
शेकडो कार्यकर्ते बाईक रॅलीत सहभागी - नारपोली चौकातुन भिवंडी कॉगेसचे युवक अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार रशीद ताहीर मोनिन, माजी खासदार सुरेश टावरे, महिला अध्यक्षा रेहाना अंसारी, जावेद फारुकी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते बाईक रॅलीत सहभागी झाले होते.