महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Omicron in Maharashtra : येत्या दोन दिवसात टास्क फोर्सची बैठक आयोजित करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश - टास्क फोर्स बैठक अपडेट महाराष्ट्र

सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढत्या ओमायक्रॉन संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आपल्या सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी असेही त्यांनी निर्देश दिले.

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Dec 28, 2021, 2:24 AM IST

मुंबई -कोरोनाचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. ( Corona Vaccination in Maharashtra ) आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddav Thackeray ) यांनी सोमवारी सांगितले. टास्क फोर्सची बैठकही ( Task Force Meeting ) येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी, असेही त्यांनी निर्देश त्यांनी दिले. ( Task Force Meeting Should be Organised Over Omicron in Maharashtra )

लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज -

सोमवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढत्या कोरोना संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आपल्या सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोरोनाच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. असे यावेळी त्यांनी सांगितले.

हेही वाचा -पुढील महिन्यात ओमायक्राॅन रुग्ण व मृत्यूत वाढ होण्याची भीती; ३५ हजार बेड्स अॅक्टिव्ह

गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णांत 50 टक्के वाढ -

सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल, असे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. डॉ. व्यास यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, 8 डिसेंबर रोजी 6200 सक्रिय रुग्ण होते. मात्र, आज 10 हजार सक्रिय रुग्ण आहेत. एकूणच गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णांत 50 टक्के वाढ झाली आहे. मागील सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती दिली. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 1.06 टक्के झाल्याची माहिती देण्यात आली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details