मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जो आदेश देतील तो मला मान्य असेल, असे स्पष्टीकरण आज अजित पवार यांनी दिले. त्यामुळे अजित पवार राजकारणातच सक्रिय राहणार असल्याचे दिसते आहे. पवारसाहेब हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यांचा आदेश आमच्यासाठी सर्वोच्च असल्याचे अजित पवार म्हणाले.
माझ्यामुळे साहेबांची बदनामी झाली म्हणून, मी अस्वस्थ होतो. त्याच अस्वस्थेतून मी राजीनामा दिला असल्याचे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. अजित पवार यांनी काल (शुक्रवारी) राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
आमचा पवार परिवार हा मोठा आहे. आमच्या कुटुंबात साहेब सांगितल तेच आम्ही मान्य करतो. उगीच आमच्या घरात गृहकलह असल्याच्या चर्चा लोक करत आहेत. आमच्यात कोणतेही कौटुंबीक वाद नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.