महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कंगना राणावत परत एकदा वादात...! - वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालय कंगना वाद

अभिनेत्री कंगना राणावत तिची बहीण आणि इतर दोन जणांविरूद्ध "दिड्डा - काश्मीर की योद्धा राणी" चे लेखक आशिष कौल यांनी केलेल्या कॉपीराइट उल्लंघनाच्या आरोपाखाली एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई
मुंबई

By

Published : Mar 12, 2021, 10:20 PM IST

मुंबई- वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री कंगना राणावत तिची बहीण आणि इतर दोन जणांविरूद्ध "दिड्डा - काश्मीर की योद्धा राणी" चे लेखक आशिष कौल यांनी केलेल्या कॉपीराइट उल्लंघनाच्या आरोपाखाली एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. कंगनाविरूद्ध एफआयआर कलम 406 (विश्वासाचा भंग), 120 (गुन्हेगारी कट रचणे) आणि आयपीसीच्या 34 आणि कॉपीराइट कायद्याच्या कलम (कॉपीराइट उल्लंघन) अंतर्गत 63 आणि 63 ए अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

याआधी गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या गुन्हेगारी मानहानी खटल्यात अंधेरी येथील महानगर दंडाधिकाऱ्यानी दिलेल्या आदेशाला आव्हान देण्यासाठी दिंडोशी येथील मुंबई-सत्र न्यायालयात कंगनाने धाव घेतली आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात हे वॉरंट देण्यात आले आहे.

अभिनेत्रीविरोधात जामीनपत्र वॉरंट जारी

अंधेरीच्या मेट्रोपॉलिटन दंडाधिकाऱ्यांना अभिनेत्रीविरोधात जामीनपत्र वॉरंट जारी केले आहे. वास्तविक, न्यायालयाने समन्स पाठवूनही न्यायालयात हजर न झाल्यामुळे न्यायालयाने हे पाऊल उचलले आहे. बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये जावेद अख्तरने सांगितले होते की, कंगनाने त्यांच्यावर कोणतेही आधार न घेता खोटे विधान केले आहे. ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला इजा झाली आहे, असे म्हटले आहे. जावेद अख्तरने हृतिक रोशनसोबतच्या तिच्या कथित संबंधांबद्दल मौन बाळगण्याची धमकी दिली होती, असा दावा कंगनाने दावा केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details