महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सरकारकडून आदेश - महाराष्ट्रातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या बातमी

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी झाली आहेत. हे आदेश विधिमंडळाचे अधिवेशन संपताच राज्य सरकारने दिले आहेत.

मंत्रालय
मंत्रालय

By

Published : Sep 9, 2020, 9:43 PM IST

मुंबई - विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पोलिसांच्या बदल्यानंतर आज (दि. 9 सप्टें.) अधिवेशन संपताच राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या केल्या आहेत. म्हाडाच्या उपाध्यक्षपदी अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आधी ते पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव होते. विशेष म्हणजे दुपारी निघालेल्या आदेशाप्रमाणे अनिल डिग्गीकर यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, काही वेळातच त्यांची म्हाडाच्या उपाध्यक्षपदी बदली करण्यात आली. तर प्रशांत नारनवरे यांची नियुक्ती पुणे जिल्ह्याच्या समाजकल्याण कल्याण आयुक्त पदावर करण्यात आली आहे. या पदावर काही काळापूर्वी प्रविण दराडे यांची नियुक्ती केली होती. मात्र, आता त्यांना या पदावरुन हटविण्यात आले आहे.

आज झालेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • विवेक जॉन्सन यांची अधिसंख्य सहाय्यक जिल्हाधिकारी उस्मानाबाद येथीन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा आणि साहाय्यक जिल्हाधिकारी भंडारा या पदावर बदली झाली आहे.
  • अमित सैनी यांनी मुंबईच्या सहायक विक्रीकर आयुक्त पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम मंडळ, मुंबई या रिक्त पदावर बदली झाली आहे.
  • दीपक कुमार मीना यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, वाशिम येथून गोंदियाच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे.
  • अनिल डिग्गीकर यांची म्हाडाच्या उपाध्यक्षपदी बदली झाली आहे.
  • एस. राममूर्ती यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, नागपूर येथून बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी पदी बदली झाली आहे.
  • प्रशांत नारनवरे यांची समाजकल्याण पुणे येथील आयुक्तपदी बदली झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details