महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील 'केशरी' शिधापत्रिका धारकांची दैना; सरकारच्या निर्णयामुळे जनतेत संभ्रम - orange ration card holder crisis mumbai

सरकारने केशरी शिधापत्रिका धारकांनासुद्धा सवलतीच्या दरात धान्य मिळणार या बातमीनंतर शिधापत्रिका धारकांनी रेशनच्या दुकानात गर्दी करायला सुरुवात केली. स्वस्त दरात धान्य मिळेल, या आशेने लोक दुकानात पोहोचू लागले. मात्र, सरकारने काढलेल्या अध्यादेशात केशरी शिधापत्रिका धारकांना मे आणि जून या दोन महिन्यांकरिता ही सवलत सरकारने दिली. त्यामुळे केशरी शिधापत्रिका धारकांची द्विधा मनस्थिती झाली आहे.

मुंबईतील 'केशरी' शिधापत्रिका धारकांची दैना...
मुंबईतील 'केशरी' शिधापत्रिका धारकांची दैना...

By

Published : Apr 16, 2020, 6:17 PM IST

मुंबई - राज्यातील केशरी शिधापत्रिका (रेशन कार्ड) धारकांनाही आता धान्य सवलतीच्या दरात मिळणार आहे, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी ही घोषणा केली. राज्यभरातील लॉकडाऊनची परिस्थिती पाहता त्यांनी ही घोषणा गेल्या आठवड्यात केली. तसा 8 तारखेला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय ही घेण्यात आला.

सरकारने केशरी शिधापत्रिका धारकांनासुद्धा सवलतीच्या दरात धान्य मिळणार या बातमीनंतर शिधापत्रिका धारकांनी रेशनच्या दुकानात गर्दी करायला सुरुवात केली. मुंबईतील दादर परिसरात नागरिकांनी रेशनच्या दुकानावर आणि शिधापत्रिका कार्यालयात गर्दी करायला सुरुवात केली. स्वस्त दरात धान्य मिळेल, या आशेने लोक दुकानात पोहोचू लागले. मात्र, सरकारने काढलेल्या अध्यादेशात केशरी शिधापत्रिका धारकांना मे आणि जून या दोन महिन्यांकरिता ही सवलत सरकारने दिली. त्यामुळे केशरी शिधापत्रिका धारकांची द्विधा मनस्थिती झाली आहे. स्वस्त दरात धान्य मिळणार म्हणून लोक लोकडाऊनच्या परिस्थितीतसुद्धा सोशल डिन्सन्सिंगची पर्वा न करता लोक दुकानांवर गर्दी करत होते.

हेही वाचा -कोरोनाचा फटका : नांदेडमध्ये अडकलेल्या उत्तराखंडच्या जगदगुरूंना 'या' मंत्र्यांमुळे मिळाली प्रवासाची परवानगी

कोरोनाने देशात थैमान घातले आहे. देशभरात सुरू असलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. त्यात सरकारने घेतलेले निर्णयाची अंमलबजावणी नीट न होत असल्यामुळे जनतेमध्ये संभ्रमावस्था आहे. सरकारने जर वेळेस उपाययोजना नाही केल्या तर हा संभ्रम वाढण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details