मुंबई :देशातील विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या भ्रष्टाचार, महागाईविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचा विचार करत आहेत. त्या निमित्ताने केसीआर, ममता बॅनर्जी, नितीशकुमार यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची ताकद पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत यश मिळण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्राला महत्त्व प्राप्त होत आहे.
पवारांचे सर्वसमावेशक नेतृत्व :गेल्या ४५ वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात वावरणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. देशातील सर्व प्रादेशिक, राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांशी शरद पवारांचे संबंध, पवारांच्या शब्दाला दिलेला मान लक्षात घेता या बैठकीत शरद पवार यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाण्याची शक्यता आहे. शरद पवार हे सर्वसमावेशक नेते असल्यामुळे देशातील विविध प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यात आणि एक समान अजेंडा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा स्वतः नितीश कुमार यांनी व्यक्त केली आहे.
भाजप विरोधात एकत्रित लढा :मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी स्पष्ट विधान केले. पाटणा येथे होणाऱ्या या बैठकीसाठी आपल्याला नितीशकुमार यांचा फोन आला असून त्यानुसार आपण या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. या बैठकीला देशातील प्रमुख नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीला आपणही उपस्थित राहणार आहोत, असे सांगून पवार म्हणाले की, राष्ट्रीय प्रश्नांवर एकत्र काम करून भाजप विरोधात एकत्रित लढा देण्याची गरज आहे. त्यामुळे या होणाऱ्या युतीला पाठिंबा देण्याची जबाबदारी आपली असल्याचे पवार म्हणाले होते.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे देशातील दोन मोठे नेते आहेत. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले तरच देशाचे हित साधले जाईल, हेही त्यांना माहीत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील. - रविंद्र चव्हाण, अन्न, नागरी पुरवठा मंत्री