मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कालपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पहिला दिवस प्रस्तावांमध्ये शांतपणे पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र विरोधक आक्रमक झाले आहेत. कोरोना नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्याची घोषणाबाजी करत विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले.
विरोधकांकडून विधिडळाच्या दारात ठिय्या आंदोलन; कोरोना नियंत्रणात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप - विरोधक ठिय्या आंदोलन न्यूज
विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. कोरोना नियंत्रणात ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्याची घोषणाबाजी करत विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, हरिभाऊ बागडे, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक आमदारांनी सरकारचा निषेध केला.
कोरोना हाय हाय... ठाकरे सरकार बाय-बाय, मुख्यमंत्री सहाय्यता कोविड-19 निधीमध्ये जमा झालेल्या रकमेपैकी फक्त एक चतुर्थांश रक्कम खर्च करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, स्वतः घरातबसून रिमोटने सरकार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्याचा धिक्कार असो, कोरोना महामारीत जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, व्हेंटिलेटर-अॅम्बुलन्स डॉक्टरांना न देता रुग्णांचे नाहक बळी घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशी जोरदार घोषणाबाजी विरोधकांनी केली.
या आंदोलनात आमदार गिरीश महाजन, हरिभाऊ बागडे, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक आमदारांनी सरकारचा निषेध केला.