मुंबई - राज्याची राजधानी मुंबईमध्ये काही ठराविक ठिकाणी येत्या 25 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून 'नाईट लाईफ' सुरू होणार आहे. मात्र, या नाईट लाईफवरून विरोधकांनी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. 'नाईट लाईफ' म्हणजे 'बेदरकार चैन' नसून मुंबईच्या शिफ्टनुसार काम करणाऱ्या नागरिकांना सेवा देण्यासाठी योजना आहे, असे स्पष्टीकरण परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले.
'नाईट लाईफ' या शब्दाचे विरोधकांकडून राजकारण
विरोधक 'नाईट लाईफ' या शब्दाचा चुकीचा अर्थ लावून राजकारण करत आहेत. नाईट लाईफ म्हणजे 'बेदरकार चैन' असा अर्थ नसून मुंबईच्या शिफ्टनुसार काम करणाऱ्या नागरिकांना सेवा देण्यासाठी योजना आहे, असे स्पष्टीकरण परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले.
हेही वाचा - 'आव्हान म्हणून स्वीकारल्यास डॉ.आंबेडकरांचे स्मारक दोन वर्षात होणार पूर्ण'
23 जानेवारीला शिवसेनेचा वचनपूर्ती विजयी जल्लोष मेळावा वांद्रे येथील बांद्रा-कुर्ला कॉम्पेक्समध्ये (बिकेसी) पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी परब आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधक नाईट लाईफ या शब्दाचा चुकीचा अर्थ लावून राजकारण करत आहेत. मुंबई शहरात चोवीस तास काम चालते. रात्रपाळीदरम्यान काम करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या गरजेच्या सुख-सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, या हेतूने नाईट लाईफ सुरू करण्यात येणार आहे, असे परब यांनी सांगितले.