महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचे पंडित नेहरू यांच्या विरोधात वादग्रस्त विधान.. परिषदेत गदारोळ - pravin darekar

सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावर उल्लेख चुकीचा असल्यास मी कामकाजातून काढून टाकतो, असे अनेकदा सांगितल्यानंतर ही सत्ताधारी पक्षातील सदस्य शांत न झाल्याने सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. मात्र, त्यानंतरही विरोधी पक्षनेत्यांनी आपल्याकडून झालेल्या चुकीच्या विधानाबद्दल कसलीही खंत व्यक्त केली नाही. त्यामुळे सभागृहांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून त्यांच्यावर जोरदार आक्षेप घेण्यात आले.

विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर
विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर

By

Published : Jan 8, 2020, 4:13 PM IST

Updated : Jan 8, 2020, 4:56 PM IST

मुंबई- अनुसूचित जाती जमाती यांच्या आरक्षणाच्या संदर्भातील सुधारणा विधेयक आज परिषदेच्या सभागृहात मांडण्यात आले. त्याला संमती देताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संविधान सभेचा दाखला देत पंडित नेहरू यांनी या आरक्षणाला विरोध केला होता, असा उल्लेख केला. त्यावर सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतल्यामुळे विधान परिषदेमध्ये गदारोळ निर्माण झाला होता.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावर उल्लेख चुकीचा असल्यास मी कामकाजातून काढून टाकतो, असे अनेकदा सांगितल्यानंतर ही सत्ताधारी पक्षातील सदस्य शांत न झाल्याने सभागृहाचे कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. मात्र, त्यानंतरही विरोधी पक्षनेत्यांनी आपल्याकडून झालेल्या चुकीच्या विधानाबद्दल कसलीही खंत व्यक्त केली नाही. त्यामुळे सभागृहांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून त्यांच्यावर जोरदार आक्षेप घेण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनुसूचित जाती जमाती त्या सुधारणा विधेयकाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहात मांडून त्यावरील आपले भाषण पूर्ण केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे बोलायला उठले. त्यांनी आपल्या भाषणात गोलमेज परिषदेत बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. त्यानंतर आरक्षण मिळाले, असे सांगत याच आरक्षणाला संविधान सभेत पंडित जवाहरलाल नेहरूंनी विरोध केला होता, असे विधान केले. त्यावर शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आक्षेप घेतला.

विरोधी पक्षनेते हे सभागृहात खोटे आणि खोडसाळपणाचे विधान करत असून त्यांनी हे विधान मागे घ्यावे, अथवा त्याचे विधान कामकाजातून काढून टाकावे, अशी मागणी त्यांनी सभापतींकडे केली. विरोधी पक्षनेत्यांनी एखाद्या विधानाची कॉपी करताना किमान त्याची नीट कॉपी करावी, चुकीची कॉपी करू नये, त्यांनी भाषण वाचावे, असे आवाहन केले. मात्र बाजूला बसलेले भाजप आमदार भाई गिरकर यांनी कपिल पाटील यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभागृहांमध्ये काही वेळ भाई गिरकर आणि कपिल पाटील हे एकमेकाविरोधात भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्याच दरम्यान काँग्रेसचे भाई जगताप, शरद रणपिसे आणि प्रा. जनार्दन चांदूरकर यांनीही विरोधी पक्षनेत्यांच्या विधानाचा विरोध करत ते सर्व कामकाजातून काढून टाकावे, अशी मागणी सभापतींकडे केली.

शरद रणपिसे यांनी विरोधी पक्षनेत्यांनी कोणतेही कारण नसताना काँग्रेसचा उल्लेख केला. त्यांचे ते विधान कामकाजाच्या पटलावरून काढून टाकावे, अशी मागणी केली. तर आमदार भाई जगताप यांनी विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहाची माफी मागायला हवी, अशी मागणी केली. त्यावर भाजपचे सदस्य आक्रमक झाल्याने सभागृहात गदारोळ वाढला. यामुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेचे कामकाज पंधरा मिनिटांसाठी तहकूब केले होते. त्यानंतर कामकाज सुरू झाले. मात्र, विरोधी पक्षनेत्यांनी आपल्याकडून झालेल्या विधानाची कोणतीही त्यासाठीची माघार घेतली नाही.

सभापती नेत्यांना बोलल्यास संधी दिल्यानंतर त्यांनी मूळ विधेयकावर आपले मत मांडण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत कोण पाडले होते, असे विधान करून पुन्हा एकदा सभागृहात गदारोळ निर्माण केला. त्यावर सभापतींनी आक्षेप घेत राजकीय भाषण करू नका, आपण काय बोलता हे लक्षात घ्या, असे निर्देश दिले. परंतु विरोधी पक्षनेत्यांनी न ऐकता आपले बोलणे सुरू ठेवत सभागृहात मांडलेल्या विधेयकाला आपली संमती असल्याचे सांगत पाठिंबा दर्शवला.

Last Updated : Jan 8, 2020, 4:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details