मुंबई -सायन रुग्णालयातील घटना अत्यंत गंभीर आहे. प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे हे गंभीर आहे. मुंबईकरांचा कोणीच वाली नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने तत्काळ लक्ष घालावे व अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी याबाबत ट्विट केले आहे.
मुंबईच्या सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंदर्भात माजी खासदार किरीट सोमैया यांनी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडे (ICMR) तक्रार केली. आमदार नितेश राणे यांनी बुधवारी हा व्हिडिओ ट्विट केला होता. यामध्ये कोरोना रुग्णांच्या वॉर्डमधील धक्कादायक चित्र दिसून आले होते.