मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना २४ ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. यानंतर ते सेंट जॉर्ज या शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. आता ते ठीक झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
फडणवीस यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पुढचे १० दिवस त्यांना डॉक्टरांनी घरीच आराम करण्याचा सल्ला दिला असून, ते आता होम क्वारंटाईन होणार आहेत.