मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर ( Shivneri Fort Pune ) झाला, तिथले खासदार अमोल कोल्हे आहेत. रायरेश्वरवर शपथ घेतली तो किल्ला खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांच्या भोर मतदार संघात येतो. प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी ( Chhatrapati Shivaji Maharaj ) काढला तो किल्ला खासदार श्रीनिवास पाटील यांच्या मतदारसंघात आहे. तर, हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड स्थापन केली ती राजधानी खासदार सुनिल तटकरे यांच्या मतदार संघातच आहे आणि हे सर्व खासदार राष्ट्रवादीचे ( Nationalist Congress Party ) आहेत. त्यामुळे पक्ष एक नंबरवर न्यायचा असेल, तर आपापसातील मतभेद संपवा आणि दोन पावले मागे या, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी कार्यकर्त्यांना दिला.
Ajit Pawar Appeal To Party Workers पक्ष एक नंबरचा करायचा असेल तर, आपापसातील मतभेद संपवा - अजित पवार
राष्ट्रवादी पक्षाला ( Nationalist Congress Party ) पहिल्या क्रमांकावर न्यायचे असेल, तर कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरुन कामाला लागले पाहिजे असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे बोट धरुन राजकारणात पुढे आल्याचे सांगतात. त्यामुळे शरद पवार ( Nationalist Congress Party Chief Sharad Pawar ) यांच्या मार्गदर्शनात आगामी निवडणुकांमध्ये आपल्या विचारांचे लोक निवडून कसे येतील, असा निश्चय करण्याचे आवाहनही अजित पवार यांनी केले.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
शरद पवार हे दूरदृष्टी असलेले माजी मुख्यमंत्रीमहाराष्ट्राला ५० वर्षे पुढे नेण्याचे काम शरद पवार ( Nationalist Congress Party Chief Sharad Pawar ) यांनी केले. शिवाय राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिकाही बजावली. यशवंतराव चव्हाण ( Yashwantrao Chavan ) यांच्यानंतर दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री म्हणून शरद पवार ( Nationalist Congress Party Chief Sharad Pawar ) यांच्याकडे पाहिले गेले आहे. दूरदृष्टी ठेवत यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने वास्तू उभी करायची कल्पना आणली. ती सत्यात उतरवली हेच त्यांच्या कामाचे गमक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे बोट धरुन राजकारणात पुढे आल्याचे सांगतात. त्यांचा तो मनाचा मोठेपणा आहे. मात्र त्यांच्या मनात शरद पवार ( Nationalist Congress Party Chief Sharad Pawar ) यांच्याबाबत असलेले स्थान लक्षात घेतले पाहिजे असेही अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar Appeal To Party Workers ) यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपल्या विचारांचे लोक निवडून कसे येतील असा निश्चय करुया असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.