मुंबई- हिवाळी अधिवेशनच्या निमित्ताने खासगीकरणाला विरोध करत उमेद अभियानातील कर्मचारी आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी आंदोलन करत आहेत.
प्रामुख्याने राज्य शासनाने संपत्या वर्षात उमेद अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडित केल्या. तसेच अन्य संस्थेकडे हे अभियान सोपवण्याच्या दृष्टीने या कर्मचाऱ्यांची नवीन संस्थेत पुर्ननियुक्ती करण्याचे ठरवले. परंतु, प्रत्यक्षात या कर्मचाऱ्यांची पुर्ननियुक्ती तर झालीच नाही व हे कर्मचारी सेवा बंद झाल्याने उघड्यावर आले. या अभियानाच्या बाबतीत शासनाने धरसोढीचे धोरण हाती घेतल्याने त्यास जोडलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कुटुंबातील महिला बचतगट संकटात सापडले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण अभियान कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या अभियानातील सर्व कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. मागणी पूर्ण होईपर्यंत माघार घेणार नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.