महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनामुळे व्यसनमुक्तीच्या दिशेने जाण्याची संधी - वर्षा विद्या विलास

लॉकडाऊननंतर राज्यातील अनेक ठिकाणी व्यसनाधिन असलेल्या काही नागरिकांनी दारूची दुकाने फोडून त्यातून चोरी केल्याच्या घटना समोर आल्या, तर दुसरीकडे अल्कोहोल आणि दारू विकणाऱ्या व्यवसायाशी संबंधित संघटनांनी लॉकडाऊनच्या काळात दारूवरील बंदी उठविण्याची मागणी केल्याचे समोर आले होते.

महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास  महाराष्ट्र नशाबंदी मंडळ  addiction free  नशामुक्ती केंद्र महाराष्ट्र
वर्षा विद्या विलास

By

Published : Apr 19, 2020, 10:46 AM IST

मुंबई - कोरोना आणि त्या पार्श्वभूमीर राज्यात मागील तीन आठवड्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये व्यसन करणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे, तर अनेकांचा नाईलाज झाला असून ते व्यसनापासून परावृत्त होत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन ही एक व्यसनमुक्तीकडे जाण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे मत महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केले.

कोरोनामुळे व्यसनमुक्तीच्या दिशेने जाण्याची संधी - वर्षा विद्या विलास

लॉकडाऊननंतर राज्यातील अनेक ठिकाणी व्यसनाधिन असलेल्या काही नागरिकांनी दारूची दुकाने फोडून त्यातून चोरी केल्याच्या घटना समोर आल्या, तर दुसरीकडे अल्कोहोल आणि दारू विकणाऱ्या व्यवसायाशी संबंधित संघटनांनी लॉकडाऊनच्या काळात दारूवरील बंदी उठविण्याची मागणी केल्याचे समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्यात मागील अनेक वर्षांपासून नशामुक्तीच्या चळवळीत योगदान देत असलेल्या वर्षा विद्या विलास यांनी लॉकडाऊन ही व्यसनी नागरिकांना व्यसनमुक्तीकडे नामी संधी आली असल्याचे मत व्यक्त केले. व्यसनी व्यक्तीला एका ठराविक काळानंतर आपल्या कुटुंबात राहताना चांगली वागणूक आणि सहकार्य मिळाले तर तो व्यसनापासून दूर जाऊ शकतो. यासाठी या काळात या लोकांना चांगली वागणूक कुटुंबांनी द्यावी, असे आवाहनही वर्षा विद्या विलास यांनी केले.

राज्याच्या निर्मितीला यंदा 60 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सरकारने महापुरुषांचा वारसा असलेले राज्य पूर्णपणे व्यसनमुक्तीकडे न्यावे आणि त्यातून देशाला चांगला संदेश द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. वेळोवेळी महसूलाचा विषय समोर आणला जातो. परंतु, त्याला पर्याय म्हणून अनेक प्रकारच्या वाहनांवर आणि इतर हौशेच्या वस्तूंवर अधिक कर लावून तो वसूल केला जाण्यासाठीचा पर्यायही त्यांनी सूचवला. लॉकडाऊनमध्ये राज्यात लाखो व्यसनी लोकांना ते न करण्याची सवय होत असून त्यासाठी लॉकडाऊन संपल्यानंतरही दारूची दुकाने, बार, वाईन शॉप आदी बंद ठेवून राज्य व्यसनमुक्त करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details